ETV Bharat / state

Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मालमत्तेची चौकशी सुरू; पुणे पोलीस दोन दिवसांपासून नाशकात तळ ठोकून

Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या (Drug mafia Lalit Patil) मालमत्तेची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. (Lalit Patil cars seized) याकरिता पुणे पोलीस मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. त्यांनी आतापर्यंत ललितच्या 50 लाखांच्या चार गाड्या जप्त केल्या आहेत. ललितने ड्रग्जच्या पैशांतून मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचं निष्पन्न झालंय.

Lalit Patil Property Investigating
ललित पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 8:14 PM IST

नाशिक Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलने ड्रग्जच्या पैशांतून सोने, प्लॉट, फ्लॅट, महागड्या गाड्या अशा प्रकारची मालमत्ता जमविली होती. (Lalit Patil property) त्याला अटक केल्यावर पुणे पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या 50 लाखांच्या चार गाड्या जप्त केल्या. तसेच नाशिकला असलेले त्याचे प्लॉट, फ्लॅटची तपासणी करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक दोन दिवसांपासून नाशिक रोड विभागीय कार्यालयात तळ ठोकून आहे.

मालमत्तेचा तपशील मागितला: ललित पाटीलच्या संपत्तीच्या नोंदणीचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. त्याच्या स्वतःच्या नावे तसेच कुटुंब सदस्य, प्रेयसीच्या नावे नाशिक शहर व जिल्ह्यात खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी मुद्रांक व नोंदणी निरीक्षकांशी पत्रव्यवहार करून ललितच्या नावे असलेल्या मालमत्तेचा तपशील मागितलाय. त्याचप्रमाणे नाशिक येथे ललितचे निवासस्थान असलेल्या उपनगर व शिंदे पळसे भागात त्याच्या तसेच भाऊ कुटुंबाची मालकी असलेल्या मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. पुणे पथकानं नाशिक रोड दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणीचे रेकॉर्ड तपासले असून त्यांना पाटील कुटुंब यांचे गाळे, भूखंड, फ्लॅट असल्याची कागदपत्रे हाती लागल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

ललितने स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर घेतली मालमत्ता: ड्रग्जमाफिया ललित पाटीलने ड्रग्सच्या पैशांतून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली. त्याने या पैशातून आठ किलो सोनं घेतलं होतं. त्यातील पाच किलो सोनं आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलं. त्याला सोने विकणाऱ्या नाशिकच्या सराफावरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच ललित पाटीलनं नाशिकमध्ये फ्लॅट आणि जमिनीत गुंतवणूक केली आहे. मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर त्यानं कोट्यवधी रुपयांची संपत्ती खरेदी केली आहे. या सर्व संपत्तीकडे आता पुणे पोलिसांनी मोर्चा वळवला आहे.

50 लाखाच्या गाड्या जप्त: ड्रग्ज माफिया ललित पाटील वापरत असलेली फॉर्च्युनर कार, पोलो, एक इनोवा सह आणखी एक कार पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. या वाहनांची किंमत सुमारे 50 लाखापर्यंत असून त्याची स्थावर मालमत्तेचीही मोजमाप सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. Drug Search Operation Nashik : गिरणा नदीत ड्रग्ज मिळालं नाही, पण पोलिसांकडून 20 कोटी लिटर पाणी वाया
  2. New Drug Smuggler : नाशिकमध्ये ललित पाटीलनंतर 'हा' आहे नवा ड्रग्ज माफिया
  3. MD Drugs Seized : नाशिक पोलिसांकडून एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, 10 कोटींचा एमडीचा साठा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.