येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील कुसूर ( Kusur Burnt Farmer Death ) येथे घडलेल्या जळीत कांडातील पीडित शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान नाशिकच्या सूर्योदय रुग्णालयात ( Nashik Suryoday Hospital ) मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कुसूर येथे शेतबांधाच्या वादातून दिलीप गायकवाड या शेतकऱ्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक करून 13 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.ो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 1 मे रोजी कुसूर येथे म्हसोबा रोडवरील शेत गट नंबर २२३.०२ मध्ये जमिनीचा बांध फोडून तीस ते चाळीस फूट जमीन नांगरली. याबाबत दिलीप शेषराव गायकवाड हे सांगण्यास गेले असता, संग्राम रामदास मेंगळ, राहुल हिंगे यांनी त्यांच्या अंगावर डिझेल ओतले; तर संग्राम मेंगळ यांनी काडी पेटवून गायकवाड यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात गायकवाड चाळीस टक्के भाजले होते. यांच्यावर नाशिक रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यात त्यांचा मृत्यू झाला आहेत.
हेही वाचा - Truck-Auto Rickshaw Accident : कोपरगावात ट्रक-रिक्षात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू तर चार जखमी