ETV Bharat / state

Vijaya Ekadashi 2023: विजया एकादशीचा उपवास केल्यास प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो- महंत अनिकेत देशपांडे - विजया एकादशी पौराणिक कथा

नावाप्रमाणेच विजया एकादशीचा उपवास केल्याने प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो. पद्मपुराणात सांगितले आहे की, या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व क्षेत्रात विजय प्राप्त होतो आणि सर्व पापांचा नाश होतो. या व्रताचे पालन केल्याने वाजपेयी यज्ञासारखे पुण्य फळ मिळते आणि शत्रूंचाही पराभव होतो, असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटले आहे.

Vijaya Ekadashi 2023
विजया एकादशी
author img

By

Published : Feb 16, 2023, 8:56 AM IST

नाशिक : ज्योतिषशास्त्रानुसार विजया एकादशी 16 फेब्रुवारीला 2023 आचरले जात आहे. पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानन्याची परंपरा आहे. आपल्याकडे आज म्हणजेच 16 फेब्रुवारी 2023 रोजी एकादशी व्रत केले जात आहे. एकादशीचा तिथी प्रारंभ सकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी झाला आहे. एकादशी समाप्ती 17 फेब्रुवारी सकाळी 2 वाजता होईल. विजया एकादशीचा दिवस कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

पौराणिक कथा : रामाच्या वनवासात रावणाने सीतेचे अपहरण केले. तेव्हा भगवान राम आणि भाऊ लक्ष्मण खूप चिंतीत पडले. माता सीतेचा शोध घेत असताना भगवान राम हनुमानाच्या मदतीने वानरराजा सुग्रीवाला भेटले. वानरसेनेच्या सहाय्याने भगवान राम लंकेवर चढाई करण्यासाठी विशाल समुद्रकिनाऱ्यावर आले. अथांग समुद्र असल्यामुळे लंकेवर चढाई कशी करायची? यावर काही उपाय मिळत नसतांना शेवटी भगवान रामाने समुद्रदेवाला मार्गे मागितला, पण मार्ग मिळाला नाही. तेव्हा भगवान रामाने ऋषी-मुनींना त्याचे निराकरण काय ते विचारले. तेव्हा ऋषींनी विजया एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. यासोबतच कोणतेही शुभ कार्य सिद्धीसाठी व्रत करण्याची परंपरा असल्याचेही सांगितले.

पूजा कशी करावी : विजया एकादशीच्या आदल्या दिवशी वेदी बनवून त्यावर सात धान्य ठेवावे. मग त्यावर कलश ठेवा. एकादशी तिथीला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून ध्यान करावे, त्यानंतर हातात फुले व अक्षदा घेऊन व्रत करावे. यानंतर पाच पान कलशात ठेवून चतुर्भुज स्वरूपात भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि अक्षदा, शेंदूर, धूप, दीप, फळे, फुले, तुळस अर्पण करा. यानंतर मिठाई आणि तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्यानंतर एकादशी व्रताची कथा ऐकावी व विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करावा. यानंतर 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः' मंत्राचा १०८ वेळा तुळशीमाळाने जप करावा. नंतर आरती करून दान करावे. एकादशीचे व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता.

'हे' केल्यास मोक्ष प्राप्त होतो : या एकादशी व्रताला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची उपासना केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि सर्व संकटे दूर होतात. या व्रतामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते. या व्रताबद्दल शास्त्र आणि पुराणात लिहिले आहे की,विजया एकादशीचे व्रत केल्याने अन्नदान, गाय दान, सुवर्णदान, भूमी दान यांसारखे पुण्य प्राप्त होते आणि मनुष्य जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो.

हेही वाचा : Today Horoscope : 'या' राशींच्या लोकांच्या हातून परोपकाराचे कार्य घडतील, कुलदेवतेचा पाठ करावा, वाचा, आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.