येवला (नाशिक) - मकरसंक्रात जवळ आली की येवलेकरांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. येवल्यात तीन दिवस पतंग उडविण्याची धूम असते. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या या सणाला पतंगांची तेवढीच मोठी मागणी असते. त्यामुळे येवल्यातील पतंग बनविणा-यांची लगबग सुरु असून विविध रंगांचे आकाराचे पतंग बनविण्यात कारागीर मग्न आहेत.
येवल्यात मकरसंक्रातनिमित्त पतंग व आसरी बनविण्याची लगबग २५० वर्षाची परंपरातब्बल २५० वर्षांची परंपरा असलेल्या पतंगोत्सवासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत. येथील नवी पिढीही अधिक हर्षोल्हासाने या परंपरेला साद घालत पुढे नेत आहे. यंदाही या महोत्सवासाठी पतंग, आसारी खरेदीची लगबग सुरू आहे.
पतंगावर कोरोना जनजागृतीचे संदेशपतंग उडविण्यासाठी विविध दोरे पण बाजारात आलेले आहे. बाहेर गावाहून पतंग खरेदीसाठी पतंगप्रेमी या येवला शहरात येत असून यावेळी पतंगावर कोरोना जनजागृतीचे विविध संदेश रेखाटण्यात आले आहेत.
विविध प्रकारचे पतंगगोंडेदार, अंडेदार, कवटीदार, कल्लेदार अशा अनेक प्रकारचे पतंग या ठिकाणी बनविले जातात. एप्रिल ते मे महिन्यापासून पतंग बनविण्यास सुरुवात केली जाते.
आसारी बनवण्यात मग्न कारागीरत्याचप्रमाणे येवला शहरात पतंग उडविण्यासाठी आसरी (फिरकी) बनविण्याचे काम पण करण्यात येत आहे. बांबूच्या सह्याने आसरी (फिरकी) बनविण्यात येते. सहा पाती, आठ पाती, बारा पाती अशा विविध आसरी बनविण्यात येत आहे.
हेही वाचा - औरंगाबाद विमानतळाला अजंठा-वेरूळ नाव द्यावे - रामदास आठवलेहेही वाचा - अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 402 हेक्टरवरील पिकांचे नुकसान