ETV Bharat / state

Murder in nashik : जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाची हत्या, वाचा काय आहे प्रकरण..

author img

By

Published : Nov 2, 2022, 6:35 PM IST

Updated : Nov 2, 2022, 9:03 PM IST

शहरातील जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ लिपिकाची गळा आवळून खून ( Junior clerk murdered in nashik ) केल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Murder in nashik
जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ लिपकाची हत्या

नाशिक : शहरातील जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ लिपिकाची गळा आवळून खून ( Junior clerk murdered in nashik ) केल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अशी आली घटना उघडीस - मिळालेल्या माहितीनुसार जलसंपदा विभागाच्या जलद गती कार्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय वसंतराव वायकांडे (३८,रा.मेरी वसाहत नाशिक) हे मंगळवारी मेरीच्या शासकीय वसाहतीतील घरात बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या कुटुंबियांना आढळून आल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. दरम्यान त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्या गळ्यावर खुणा मिळून आल्याचे नमूद केल्याने, पोलिसांनी खुनाच्या तपासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहे.

घरी एकटेच असल्याने घडली घटना - दिवाळी निमित्ताने मी तीन दिवस माहेरी गेली होती, तेव्हा माझे पती घरात एकटेच होते. मंगळवारी जेव्हा मी घरी आले तेव्हा माझे पती बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. मी तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांना बोलून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांची गळा दाबून हत्या झाली आहे, पोलिसांनी दोषींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मृत संजय वसंतराव वायकांडे यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

Last Updated : Nov 2, 2022, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.