ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाड यांना वादग्रस्त वक्तव्य करणं पडलं महागात; साधू महंतांकडून तक्रार दाखल

Jitendra Awadas : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये उमटत आहेत. नाशिकच्या साधू महंतांनी पंचवटी पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 7:58 PM IST

Jitendra Awadas News
जितेंद्र आव्हाड यांच्या विरूध तक्रार दाखल
प्रतिक्रिया देताना महंत सुधीर दास

नाशिक Jitendra Awadas : प्रभू राम हे मांसाहारी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर नाशिक मधील साधु महंत आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्याने समस्त हिंदूंच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिक मधील साधू महंतांनी केलीय. या अर्जावर पोलीस काय भूमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल : राम हे शाकाहारी नव्हते, तर मांसाहारी होते. त्यांनी 14 वर्षे वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत आयोजित दोन दिवसीय शिबीरात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे नाशिकमधील साधू महंतांमध्ये पडसाद उमटले. आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले ते असे, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते. प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यतित केला, हे अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. त्यामुळं यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी साधू महंतांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

सरकारने कायदा करावा : रामायणात राम मांसाहारी होते असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत तसंच आम्ही कोर्टातदेखील जाणार आहोत. ईशनिंदा कायदा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने करावा, जेणेकरून हिंदू देवतांची निंदा-नालस्ती थांबेल, अशी मागणी यावेळी महंत सुधीर दास पुजारी यांनी केलीय.

जितेंद्र आव्हाडांना मानसिक उपचाराची गरज : जितेंद्र आव्हाड यांनी धर्माचे ज्ञान नाशिकला येऊन शास्त्रार्थ सभेत सिद्ध करा, खोटी प्रसिद्धी बंद करा, आव्हाडांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना अटक करावी. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे, अशा भावना पोलीस ठाण्याबाहेर हिंदू धर्मियांनी व्यक्त केल्या आहेत. एकीकडे 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिर सोहळा पार पडणार आहे. नेमके त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी असं वक्तव्य का केलं, त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे, असं साधू महंतांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शरद पवार गटात नाराजी, भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
  2. आता देवेंद्र फडणवीसही होणार डॉक्टर; जपानमधील विद्यापीठाकडून मिळाला बहुमान
  3. अयोध्या निमंत्रणाच्या प्रश्नावर उदयनराजेंनी आपल्या स्टाईलने दिलं 'हे' उत्तर, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.