नाशिक : केंद्र सरकार व झारखंड राज्य सरकारने जैन तीर्थस्थळाचा ( Jain Community Organization Nashik Mundan Movement ) पर्यटनस्थळात समावेश करण्याची मागणी करण्यात ( Protest Against Declaration of Sammed Shikhar ) आली आहे. केंद्र सरकार व झारखंड राज्य सरकारने जैन तीर्थस्थळाला पर्यटनस्थळाच्या ( Sammed Shikhar Pilgrimage Site of Jain Community ) सूचितून वगळावे यासाठी आंदोलन केले. संपूर्ण भारतात आज जैन संघटनेच्या वतीने मुंडन करून निषेध आंदोलन ( jain Shrine be Included in Tourist Destination ) करण्यात आले. प्रत्येक शहरात पाच व्यक्तींनी मुंडन केले आहे. पर्यटनस्थळाच्या यादीतून वगळले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जैन तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने निर्णय रद्द करण्यासाठी आंदोलन पवित्र तीर्थक्षेत्रांना झारखंड सरकार आणि केंद्र सरकारने इको-सेन्सिटिव्ह झोन आणि पर्यटनस्थळांच्या यादीत नामांकित केले आहे. त्यामुळे येत्या काळात येथे रिसॉर्ट्स सुरू होऊन मत्स्यपालन, कुक्कुटपालन व्यवसाय वाढणार आहे. इतर पर्यटन प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी येतील. त्यामुळे या ठिकाणचे पावित्र्य धोक्यात येईल. हा निर्णय तत्काळ रद्द करावा, यासाठी जागतिक जैन संघटनेतर्फे दिल्लीत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ज्याला आज 6 दिवस पूर्ण झाले आहेत.
देशभरातील सर्व शहरांमध्ये काढणार मोर्चे देशभरातील सर्व शहरांमध्ये मोर्चे काढण्यात आले आहेत. या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून शिखरजी संघर्ष सेनेच्या वतीने आज देशभर मुंडन आंदोलन करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध शहरांतील 500 हून अधिक तरुण मुंडन करून या निर्णयाचा निषेध करणार आहेत. यासोबतच भविष्यातही अनेक शहरांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार आहे. आज नाशिक शहरातील अशोकस्तंभावर पारस लोहाडे, मयूर गंगवाल, अजय ताथेड, संदीप जैन, दीपक काळे, शाम महाजन, तुषार कासलीवाल, देवेश बोरा यांनी मुंडन केले. हे मुंडन ऑनलाइन करण्यात आले आहे. ज्यामध्ये देशभरातील 500 युवक झूमच्या माध्यमातून एकत्र येऊन या निर्णयाला विरोध करीत आहेत.