ETV Bharat / state

मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात पोलिसांसाठी विलगीकरण कक्षांची निर्मिती - नाशिक संचारबंदी

छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक नाशिकचे माजी समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतीगृहाचे रुपांतर पोलीस विलगीकरण कक्षात केले आहे. याठिकाणी जवळपास ७५ फ्लॅटची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे ३५० पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वसतीगृहात पोलिसांसाठी विलगीकरण कक्षांची निर्मिती

author img

By

Published : May 1, 2020, 8:23 PM IST

नाशिक - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मात्र २४ तास आपले कर्तव्य बजावत आहे. या पोलिसांसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक नाशिकचे माजी समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतीगृहाचे रुपांतर पोलीस विलगीकरण कक्षात केले आहे. याठिकाणी जवळपास ७५ फ्लॅटची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे ३५० पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आडगावस्थित मेट भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजजवळच नाशिक ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व पोलीस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी लॉकडाऊनच्या काळात आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांची नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे वसतीगृह उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर तत्काळ राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार समीर भुजबळ यांनी मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतीगृहात पोलीस विलगीकरण कक्षासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत याठिकाणी ७५ फ्लॅटची व्यवस्था करून दिली.

मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. तसेच आवश्यक त्यावेळी कुठल्याही सामाजिक कार्यात मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. कोरोनाच्या कालवधीतसुद्धा मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विद्यार्थी व संचालकाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास सेवा बजावत असणाऱ्या पोलिसांच्या मदतीसाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी पुढे सरसावले असून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने मागणी करण्यात आल्यानंतर तत्काळ विलगीकरण कक्षासाठी विद्यार्थी वसतीगृहातील ७५ फ्लॅटची व्यवस्था करून देण्यात आली. याठिकाणी ३५० पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वसतीगृहात पोलिसांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.