ETV Bharat / state

नाशिकच्या दिंडोरीत सागावर काळ्या अळीचा प्रादुर्भाव, झाडांची वाढ खुंटण्याची शक्यता

author img

By

Published : Jul 4, 2020, 8:37 AM IST

Updated : Jul 4, 2020, 11:39 AM IST

चौसाळा, कसबे वणी, उमराळेत पुणेगाव, कोल्हेर, भातोडे, अहिवंतवाडी, ननाशी, काजी माळे, हातनोरे, वाघाड धरण परिसर, कळवण तालुक्यातील पश्चिम भाग आणि पुनद खोऱ्यातील अनेक भागात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सागावर प्रथमच काळ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असे सांगितले.

Infestation of black larvae on teak tree in Dindori and Kalvan taluka
नाशिकच्या दिंडोरीत सागावर काळ्या अळीचा प्रादुर्भाव

दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील अनेक भागांत गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवले आहे. यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे वनविभागाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी केली आहे. यासंदर्भात कुंवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण (प्रादेशिक) यांना निवेदनही देण्यात आले आहे.

तालुक्यातील चौसाळा, कसबे वणी, उमराळेत पुणेगाव, कोल्हेर, भातोडे, अहिवंतवाडी, ननाशी, काजी माळे, हातनोरे, वाघाड धरण परिसर, कळवण तालुक्यातील पश्चिम भाग आणि पुनद खोऱ्यातील अनेक भागात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सागावर प्रथमच काळ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असे सांगितले. वेळीच या अज्ञात अळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास किंवा अळीने इतर झाडे आणि शेतांतील पिकांकडे आपला मोर्चा वळविल्यास शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून उपाय योजना कराव्यात, अशी मागणी डॉ. किशोर कुवर यांनी केली.

नाशिकच्या दिंडोरीत सागावर काळ्या अळीचा प्रादुर्भाव, झाडांची वाढ खुंटण्याची शक्यता

हेही वाचा - कोरोना रुग्णांची हेळसांड थांबणार; आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

कळवण तालुक्यातील पश्चिम पट्यात आणि संपूर्ण परिसरात इन्शी, गणोरे, मोहबारी, जिरवाडे, जामले, दरेगाव, कोसुरडे, भाकुरडे, करंमभेळ, कुंमसाडी आदीसह विविध डोंगरांवर आदिवासींनी जंगल संपत्ती राखली आहे. याच भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत. जून महिन्यात झालेल्या पावसामुळे संपुर्ण डोंगर हिरवागार बहरुन आला आहे. त्यात सागाची पाने मोठी असल्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र, अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे येथील डोंगरावर ठिकठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत. तसेच सागाच्या झाडावर आलेले बहारदार हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे. यामुळे सागाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Jul 4, 2020, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.