ETV Bharat / state

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच माणुसकीला काळीमा फासणारी घटना - nashik infant breed found

जगभर 'जागतिक महिला दिन' साजरा होत असताना दुसरीकडे दिंडोरी येथे माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

infant breed found
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच माणुसकीला काळीमा फासणारी घटना
author img

By

Published : Mar 8, 2020, 4:45 PM IST

दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील अवनखेड शिवारात शनिवारी (७ मार्च) सायंकाळच्या सुमारास कादवा नदी किनारी असलेल्या जाधव वस्ती येथील ऊसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. जगभर 'जागतिक महिला दिन' साजरा होत असताना दुसरीकडे ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

आवनखेड येथील पोलीस पाटील यांना कळवल्यानंतर त्यांनी दिंडोरी पोलीस ठाणे येथे खबर दिली. दिंडोरी पोलीसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवले व सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड करीत आहे.

दिंडोरी तालुक्यात ऊसाची व द्राक्षाची शेती आहे. तसेच सप्तश्रृंगी देवस्थाच्या पाठीमागे अहिवंतवाडी पायरपाडा या ठिकाणी वनविभागाचे मोठे श्रेत्र असल्यामुळे, असे नकोशी अर्भक बऱ्याचदा आढळून येतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.