नाशिक : असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाला प्रेम होतं. पण ते प्रेम प्रत्येकालाच मिळतं असं नाही. असंच काहीसं एशियाड सर्कसमध्ये जोकरची भूमिका करणाऱ्या साहिल बद्दल म्हणता येईल. साहिल गेल्या आठरा वर्षापासून लोकांना आपल्या कलेच्या माध्यमातून आनंद देण्याचे काम करत आहे. मात्र प्रेमभंग झाल्याने त्याच्या आयुष्यात दुःखाची किनार आहे.
मेरा नाम जोकर : मेरा नाम जोकर या चित्रपटाच्या माध्यमातून शो मॅन राज कपूर यांनी जोकरच्या जीवनाचा प्रवास मांडला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. जोकरच्या जीवनात येणारे प्रसंग प्रेक्षकांना मनाला चटका लावून गेले होते. या चित्रपटात जोकरची भूमिका करणाऱ्या राज कपूर यांना प्रेम मिळालं नव्हतं,असंच काहीसं एशियाड सर्कस मध्ये जोकरची भूमिका साकारणाऱ्या साहिल शेख यांच्या बाबत घडलं आहे. साहिल मूळचे बिहार येथिल आहे. उंची कमी असल्याने त्यांना जीवनात अनेक संघर्ष करावा लागला आहे. घरात आई, वडील, दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी सर्कसमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. आज ते गेल्या अठरा वर्षांपासून सर्कसमध्ये येणाऱ्या आबाल वृद्ध प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे.
अधुरी प्रेम कहाणी : प्रत्येला आयुष्यात एकदा तरी प्रेम होतं. मला ही झालं होतं. पण आमचं प्रेम टिकल नाही. तिचे आणि माझे विचार जमले नाहीत. याची खंत वाटते, जीवनातील प्रवासात प्रेमाचे कोणी तरी सोबत असावे असे प्रत्येकला वाटते. पण प्रत्येकाला प्रेम भेटतच असे नाही. आता सर्कसच आपले कुटुंब आहे. जिना यहा मरना यहा, इसके सीवा जाना कहा, असे साहिल यांनी म्हटले आहे.
चेहऱ्यावरील आनंद : सर्कशीमधील जोकर हा प्रत्येकाला जीवनात नेहमी आनंदी राहण्याचे शिकवतो. जीवनात कितीही सुख दुःख आले. तरी माणसाने चेहऱ्यावर आनंद असावा, या सृष्टीवर आपण अभिनय करण्यासाठी आलो आहोत. चित्रपटामधील अभिनेता ज्याप्रमाणे परिस्थितीवर मात करतो. तसे आपण जीवनात सुखदुःखवर आणि वाईट परिस्थितीवर सकारात्मक दृष्टी ठेवून विजय मिळवायला हवा. प्रत्येकाने स्वतःला या सृष्टीवर उत्कृष्ट अभिनेता समजावे. सर्कसमधील जोकरप्रमाणे माणसाने जीवनात कायम आनंदी राहिला शिकल पाहिजे, असा संदेश यातून मिळतो.
हेही वाचा : Nashik News: जनावरांवरील बंदीमुळे सर्कसचे अस्तित्व धोक्यात; 100 पैकी उरल्या केवळ 6 सर्कस