ETV Bharat / state

भुजबळांच्या हस्ते नाशिकमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्लँटचे उद्घाटन

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विल्होळी येथील जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लँटचे उद्घाटन झाले. या वेळी, या प्लँटद्वारे जिल्ह्यातील ऑक्सिजनची 70 टक्के गरज भागवली जाण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भुजबळांच्या हस्ते जाधव गॅसेसच्या ऑक्सिजन निर्मिती प्लँटचे उद्घाटन

author img

By

Published : Oct 13, 2020, 2:13 PM IST

Updated : Oct 13, 2020, 2:21 PM IST

नाशिक - 'कोरोना आपत्ती रोखण्यासाठी गेल्या 7 महिन्यांपासून सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहे. या आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील आहोत, कोरोनाबधितांवर वेळेवर उपचार होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता जाधव गॅस प्लँटने एका दिवसात 2 हजार सिलेंडर भरण्याची क्षमता असलेले युनिट उभे करून कौतुकास्पद काम केले आहे,' असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. विल्होळी येथील जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लँटच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

भुजबळांच्या हस्ते नाशिकमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्लँटचे उद्घाटन

'जिल्ह्याला 25 मेट्रीक टन ऑक्सिजन म्हणजे 4 हजार सिलिंडर दररोज लागणार असून विल्होळी येथील ऑक्सिजन प्लँटद्वारे 2 हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार आहे. परंतु डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याची आवश्यकता 25 मेट्रीक टन असली तरी, 50 मेट्रीक टनांची क्षमता ठेवणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात सगळे बंद असतानाही समाजिक भान ठेवून अतिशय मेहनतीने अमोल जाधव यांनी या ऑक्सिजन प्लँटची उभारणी केली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नसून प्रत्येक रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळेल,' असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा - आणखी एका कोरोना लसीची चाचणी थांबली; दुष्परिणाम आढळल्याने निर्णय

'साधारण गेल्या एक महिन्याची कोरोना संसर्गाची आकडेवारी बघता जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल होत आहे. पण तरीही जिल्ह्यात कोठेही ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी जाधव गॅस प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला होता. या प्लँटच्या माध्यमातून शहरात आज वैद्यकीय व उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या 70 टक्के ऑक्सिजनची गरज पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही ऑक्सिजन पुरवू शकेल, अशी अपेक्षाही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली. कोरोना आपत्तीचे इष्टापत्तीमध्ये रुपांतर करणे म्हणजे जिल्ह्यात आरोग्य हब, वेलनेस हब, आयटी पार्क, शिक्षण हब, कृषी विषयक उद्योग वाढवणे; त्याच दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. परंतु, कोरोनानंतर भविष्यकाळासाठी आपल्याकडे सक्षम आरोग्य यंत्रणा असायला हवी. या दृष्टीने आता आपण प्रयत्न करणे अपेक्षित आहे,' असेही भुजबळ यांनी म्हटले

यावेळी नगरसेविका संगीता जाधव, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार नितीन भोसले, जिल्हा उद्योग व्यवस्थापक सतीश भामरे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जाधव गॅसेस ऑक्सिजन प्लँटचे संचालक अमोल जाधव, एचपीसीएल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रलय जांभुळकर,अक्षय जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा - परिवहन मंत्री अनिल परब कोरोनाबाधित, लीलावती रुग्णालयात दाखल

Last Updated : Oct 13, 2020, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.