नाशिक - हैदराबाद प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही जनभावना होती. परंतु, त्यांना कोणत्या परिस्थितीत मारले गेले हे पाहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. हैदराबाद प्रकरणातील चारही आरोपींचा आज पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - हैदराबाद एन्काऊंटर : शाळकरी मुलींचा जल्लोष, तर नागरिकांनी दिल्या संमिश्र प्रतिक्रिया
थोरात यांनी यावेळी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. थोरात म्हणाले, "खडसे यांचे भाजपसाठीचे योगदान मोठे आहे. विरोधात असलो तरी त्यांचे काम मी जवळून पाहिले आहे" निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून आता परत येऊ इच्छिणाऱ्यांविषयी कार्यकर्त्यांसोबत बोलूनच निर्णय घेणार असल्याचेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.