ETV Bharat / state

दुष्काळी परिस्थितीवर मात करत घेतले 'एक्सपोर्ट' क्वालिटीच्या द्राक्षांचे उत्पादन..

तरुण शेतकरी सचिन दराडे यांनी द्राक्षाची लागवड केली असून, याची निर्यात इंग्लंड आणि रशिया या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांनी अंदाजे 350 ते 400 क्‍विंटल द्राक्षाचे उत्पादन होणार असल्याचे सांगितले आहे. चांगला भाव मिळाला तर प्रति एकरी 8 ते 9 लाख रुपये हाती येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

author img

By

Published : Feb 15, 2020, 11:59 AM IST

sachin darade
सचिन दराडे

नाशिक - पाचवीला पुजलेला दुष्काळ, तुरळकच येणारे पिण्याचे पाणी, पाण्यासाठी कायम आंदोलन आणि न्यायालयात खेटे घालणारे गाव म्हणून ओळख असलेले मनमाड हे गाव आहे. नांदगाव तालुक्यात येणाऱ्या मनमाडमध्ये दुष्काळी परिस्थितीतही तरुण शेतकरी सचिन दराडे याने द्राक्षाची बाग लावून एक्स्पोर्ट क्वालिटीचे उत्पादन घेत लाखो रुपयांचा नफा कमविला आहे. त्याचा आदर्श येथील इतर शेतकऱ्यांनी घ्यावा व पारंपरिक शेती बंद करून असे नवनवीन प्रयोग करत शेती करावी असे सचिन म्हणतोय.

दुष्काळी परिस्थितीवर मात करत त्याने घेतले 'एक्सपोर्ट' क्वालिटीच्या द्राक्षाचे उत्पादन

हेही वाचा -

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; १ ठार तर २ जण जखमी

तरुण शेतकरी सचीन अरविंद दराडे यांनी नोकरीच्या मागे न लागता पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करण्याचे नियोजन केले. त्यांनी ऍग्रीकल्चर डिप्लोमा या विषयात शिक्षण घेतले आहे. दुष्काळातही या दोघांनी प्रेरणादायी शेती कसली आहे. पाण्याचे उत्तम नियोजन करुन ठिबक तंत्राचा वापर करत द्राक्षाची शेती कसली आहे. सचिन दराडे यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांना 30 ते 35 एकर जमीन आहे. सचिन यांचे वडील व काका शेती करतात. सचिन विविध व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत त्यांना शेतीकामात मदत करतात. त्यांनी तीन एकरमध्ये द्राक्षांची लागवड केली आहे. तसेच उरलेल्या क्षेत्रात कांदा, बाजरी तसेच शेडनेटमध्ये शिमला मिर्ची इत्यादी पिके घेतली आहेत.

स्वतः एक एकरचे शेततळे खोदून पावसाळ्यात त्यांच्याकडे असलेल्या विहिरीमधून ते त्यामध्ये पाणी साठवतात. कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या तसेच गंभीर पाण्याची समस्या असणाऱ्या मनमाड शहरात त्यांनी द्राक्ष बाग जगवत ठेऊन चांगले उत्पादन मिळविले आहे यंदा मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस तसेच कायम बदलत असलेले हवामान अशा परिस्थितीही त्यांनी मेहनतीने व अथक प्रयत्नातून तीन एकरमध्ये लावली आहेत. त्यांनी प्रत्येक झाडाला गोमूत्र आणि शेणखत यांपासून बनविलेले ऑरगॅनिक खत दिली आहेत . कमीतकमी रासायनिक भेसळ खत देत चांगल्या आणि एक्स्पोर्ट क्वालिटीचे उत्पादन मिळविले आहे.

फेब्रुवारी महिन्यात द्राक्षांची तोड चालू झाली असून, त्याची विक्री थेट ट्रेडिंग कंपनीमार्फत इंग्लंड आणि रशिया या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांनी अंदाजे 350 ते 400 क्‍विंटल द्राक्षाचे उत्पादन होणार असल्याचे सांगितले आहे. चांगला भाव मिळाला तर प्रति एकरी 8 ते 9 लाख रुपये हाती येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना आतापर्यंत द्राक्षे कलम, खते, छाटणी, फवारणी, मशागत इत्यादीचा खर्च साडेचार ते 5 लाखांपर्यंत गेला आहे. द्राक्षबाग व्यवस्थापन व पाणी नियोजन करण्यासाठी सचिनला त्याचे काका मोलाचे सहकार्य करत असल्याचे सचिन म्हणाले. पाण्याचे योग्य नियोजन, पिकाची सूक्ष्म निरीक्षण, किडरोग नियंत्रणासाठी तात्काळ उपयोजना, योग्यवेळी खते फवारणी, वातावरणात होणारे बदल याबद्दल दक्ष राहिल्यास शेती चांगली पिकते, असे त्यांनी सांगितले. या परिसरात एकही द्राक्षाचा बाग नाही. त्यांनी कठोर मेहनत व जिद्द या जोरावर दुष्काळ जमिनीतही ही बाग यशस्वी करुन दाखवली आहे. उत्तम व्यवस्थापनाद्वारे शेती यशस्वी करून त्यांनी इतर शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा -

जपानच्या किनाऱ्यावरील अलिप्त ठेवलेल्या जहाजातील तीन भारतीयांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.