नाशिक - राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी पहाटे दोन वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करत लाखो रुपयांचा अवैद्य मद्यसाठा हस्तगत केला आहे.
13 लाखाच्या मुद्देमालासह चार जण ताब्यात -
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी पहाटे दोन वाहनांचा पाठलाग करत 13 लाख 53 हजार 400 रुपयांचा अवैद्य मद्य साठा जप्त केला आहे. तसेच या कारवाईत वाहन चालकासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
अबोली फाटा परिसरातून केली जात होती अवैद्य मद्य वाहतूक -
राज्य उत्पादन शुल्क पथकाला शुक्रवारी पहाटे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा परिसरातून अवैद्य मद्य वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने वाहन क्रमांक (एम .एच 15 सीआर 5721) व दुसरे वाहन (जीजे 05 सीडी 4956) यांचा पाठलाग केला या कारची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले विदेशी अवैद्य मद्य आढळून आले राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने वाहतूक करणारे विक्रम अंगाजी साळुंखे ( रा. भरत नगर औरंगाबाद) अशोक मच्छिंद्र दसपुते ( रा. आडगाव औरंगाबाद ) भावेश परमार व चंद्रदीप परमार( रा. भावनगर गुजरात) यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून अवैद्य मद्यसाठा व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली दोन्ही चारचाकी वाहने असा एकूण 13 लाख 53 हजार 400 रुपयांचा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक : सिनेस्टाईल पाठलाग करत 13 लाखांचा अवैद्य मद्यसाठा जप्त - Illegal liquor seized in Nashik
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी पहाटे दोन वाहनांचा पाठलाग करत 13 लाख 53 हजार 400 रुपयांचा अवैद्य मद्य साठा जप्त केला आहे. तसेच या कारवाईत वाहन चालकासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.