ETV Bharat / state

पतीकडून पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार, अनैतिक संबंधातून खून केल्याचा संशय - पतीकडून पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार

पतीने पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची घटना नाशकातील पाथर्डी गावात घडली. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

husband killed his wife boyfriend in nashik
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Dec 6, 2019, 5:42 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील पाथर्डी गावात पतीने पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. यामध्ये प्रियकराच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नरपतसिंग गावित, असे मृत व्यक्तीचे नाव असून अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

पतीकडून पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार

विठ्ठल गव्हाणे, असे संशयित आरोपीचे नाव आहे. तसेच मृत नरपतसिंग आणि गव्हाणे हे शेजारी राहत होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. यामुळे संबंधित घरमालकाने गव्हाणे यांच्याकडून घर खाली करून घेतले होते. मात्र, शुक्रवारी नरपतसिंग हा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कंपनीत जाण्यासाठी निघाला. त्यावेळी विठ्ठल याने त्याच्यावर हल्ला केला. डोक्यावर आणि शरिरावर कोयत्याने वार केले.

हे वाचलं का? - विवाहितेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात; सासरच्या मंडळीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी गावित यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनैतिक संबंधातून ही घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. दरम्यान, आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Intro:नाशिकमध्ये पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून पतीने प्रियकराला जीवे ठार मारलंय.डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केल्यामुळे प्रियकर नरपतसिंग गावीत यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय.Body:नरपत सिंग आणि संशयित आरोपी विठ्ठल गव्हाणे हे दोघेही पाथर्डी गाव येथे एकमेकांच्या शेजारी राहतात. गेल्या पंधरा दिवसापूर्वी या दोघांचे भांडण झाले होते. यामुळे संबंधित घरमालकाने गव्हाणे याच्याकडून घर खाली करून घेतले होते. मात्र शुक्रवारी संशयित विठ्ठल याने नरपत सिंग गावित हा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीत जाण्यासाठी निघाला असता त्याच्यावर गौळाणे रस्त्यावर अचानक हल्ला चढवला. डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तातडीनं पोलिसांनी गावीत यांस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना अनैतिक संबंधातून झाल्याचे समजतेय. संशयित आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शोधक पथक रवाना झाले आहे.Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.