ETV Bharat / state

नाशिक : डिसेंबर अखेरपर्यंत कांद्याचे भाव जैसै थे? - कांदा भाव

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील इतर पिकांसोबत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेला उन्हाळी कांदादेखील संपत आला आहे. नवीन लाल कांदा बाजार पेठेत मुबलक प्रमाणात येण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवडा उजाडणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

onion
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 6, 2019, 10:00 AM IST

Updated : Dec 6, 2019, 12:58 PM IST

नाशिक - आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. यंदा आवक घटल्याने किरकोळ बाजारात कांद्याला 150 रुपये प्रति कीलो इतका उच्चांकी दर मिळत आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे. आवक आणि मागणी यांच्यात मोठी तफावत असल्याने कांदा दर वाढले आहेत. तरी डिसेंबर अखेरपर्यंत हे दर असेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील इतर पिकांसोबत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेला उन्हाळी कांदादेखील संपत आला आहे. नवीन लाल कांदा बाजार पेठेत मुबलक प्रमाणात येण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवडा उजाडणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दर जास्त असले तरी त्याचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे. भाव वाढीचा जास्त फायदा किरकोळ कांदा विक्रेते आणि व्यापारी घेत आहेत.

हेही वाचा - कांदा आयातीचा निर्णय देशातील शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी

दरवर्षी सुमारे 20 ते 25 लाख टन कांद्याची भारतातून निर्यात होत असते. मात्र यंदा देशांतर्गत बाजारातच कांद्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली आहे. शिवाय शासनाकडे नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून ठेवलेला कांदा खराब झाल्याने तोही बाजारात आणता आलेला नाही. दरम्यान, केंद्र सरकारने ईजिप्त आणि तुर्कीमधून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयात केलेला कांदा आल्यावर काही प्रमाणात भाव कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील कांदा लागवड

2018-19 मध्ये रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र 88 हजार 540 हेक्‍टर इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40 टक्के कमी लागवड झाली. जुलै ते नोव्हेंबर 2019 अखेर 10.82 मेट्रिक टन कांद्याची विक्री झाली आहे. यात जून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्वाधिक साठवणुकीतील कांदा विक्री झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

Intro:नाशिकचा कांदा खातोय भाव..किरकोळ बाजारात कांदा 150 वर...

Body:सध्या कांदा सर्वत्र चांगलाच भाव खात आहे...कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार तर कधी ग्राहकांच्या,आता तर कांद्याला 150 रुपये इतका उच्चाकी भाव मिळत आहे..पुढील महिन्या भरा पर्यंत अशीच परिस्थिती राहील असं कांदा तज्ज्ञांचे म्हणणे..कांदा एवढा भाव का खातोय,शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय का? कांद्याचे दर सामान्य होईला किती दिवस लागतील,नवीन कांदा मुबलक प्रमाणात बाजारात कधी दाखल होईल,आयात केलेल्या कांदा मुळे बाजार भावावर परिणाम होईल ह्या बाबत इटीव्ही भारत ने घेतलेला आढावा बघूया...

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे ,मात्र ह्याच नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची आवक घटल्याने कांदा सध्या भाव खातोय ,किरकोळ बाजारात कांदा दीडशे रुपयांवर जाऊन पोहोचला आहे,ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील इतर पिका सोबत कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले,यामुळे गेल्या चार महिन्यापासून कांद्याच्या भावात वाढ होत गेली,टिकणारा उन्हाळी कांदा आता संपण्यावर आला असल्याने नवीन लाल कांदा मुबलक प्रमाणात बाजार येण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवठा उजाडणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितल..

आज नवीन लाल कांद्याला नाशिकच्या बाजार समिती मध्ये किमान 5000 ते कमाल 9000 रुपये प्रति टन भाव मिळतं आहे तोच उन्हाळी जुन्या कांदा किमान 9000 ते कमाल 14000 रुपये प्रति टन भाव मिळतं असा तरी जास्त दराने विक्री होणाऱ्या कांद्याचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होतांना दिसून येत आहे...मात्र भाव वाढीचा फायदा घेत दलाल आणि किरकोळ कांदा विक्रेते चढ्या दराने कांदा विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार देखील सरास सुरू आहे...

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची लागवड..
सन 2018 -19 मध्ये रब्बी उन्हाळी हंगामाची लागवड क्षेत्र 88 हजार 540 हेक्‍टर इतकी होती,तीच सन 2017 -18 च्या तुलनेत 40 टक्के इतकी कमी लागवड झाली, 2018-19 रब्बी हंगामातील अनुकूल वातावरणामुळे हेक्टरी उत्पादनात 26.4 मेट्रिक टन इतकी होती,तसेच जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 अखेर 10.82 मेट्रिक टन इतकी कांद्याची विक्री झाली आहे, ह्यात सर्वाधिक जून ते नोव्हेंबर अखेर साठवणुकीतील कांदा विक्री झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे...

# बाजार भाव वाढीचे कारणे

1) जून 2019 मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप कांदा लागवडीसाठी रोपवाटिका वेळेवर तयार होऊ शकला नाही...
2) उशिरा पाऊस सुरू झालेला रोपे पुनर्लागवड विलंबाने झाली...
3) लागवड झालेल्या पिकांमध्ये अती व सततच्या पाऊसामुळे रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने, उत्पादनामध्ये सर्व साधारणपणे 50 ते 60 टक्के कांद्याचे नुकसान झालं...

नाशिक जिल्ह्यातील नवीन कांद्याची लागवड 4/12/2019पर्यंत
सटाणा 10605 हेक्टर
नांदगाव 8697 हेक्टर
मालेगाव 9310 हेक्टर
कळवण 4374 हेक्टर
देवळा 11150 हेक्टर
येवला 16233 हेक्टर
चांदवड 19900 हेक्टर
एकूण 82643
मात्र हा कांदा टप्या टप्याने बाजार दाखल होईल ,मुबलक कांदा बाजारात येण्यासाठी जानेवारी पहिला आठवडा लागेल...

महाराष्ट्रात प्रति व्यक्ती कडून दिवसाला 45 ग्रॅम कांदा खाल्ला जातो, एकूण लोकसंख्येपैकी 89 टक्के लोक कांदा खातात, या अनुषंगाने महाराष्ट्राला रोज साधारणपणे 6000 टन तर महिन्याला एक लाख 75 हजार टन कांद्याची आवश्‍यकता भासते...

दरवर्षी सुमारे 20 ते 25 लाख टन कांद्याची भारतातून निर्यात होत असते ,मात्र यंदा ती होणे अशक्य आहे, देशांतर्गत बाजारातचं कांद्याची पुरेसा पुरवठा होत नाही, केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली असली तरी त्याचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कुठलीही उपयोग होऊ शकला नाही,कारण कांद्याचे उत्पादन व आवक कमी आहे, शिवाय शासनाकडे नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून ठेवलेला कांदा ही मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने तोही बाजारात आणता आला नाही, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आजच्या दरवाढी कडे बघितले जात आहे...केंद्र सरकारनं ईजिप्त व तुर्की मधून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, आयात केलेला कांदा आल्यावर काही प्रमाणात भावही कमी होतील,मात्र तरी सुद्धा जानेवारी पर्यंत कांद्याचे भाव नियंत्रणात येतील असं चित्र दिसत नाही...

बाईट नरेंद्र आघाव कृषी अधिकारी
बाईट हिरामण परदेशी कांदा व्यापारी

फीड ftp
nsk onion viu 1
nsk onion viu 2
nsk onion viu 3
nsk onion vypari byte

Conclusion:
Last Updated : Dec 6, 2019, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.