ETV Bharat / state

नाशिक कोरोना अपडेट : लूट करणाऱ्या रुग्णालयांचे होणार ऑडिट - जिल्हाधिकारी

खासगी रुग्णालयाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरऐवजी थेट अतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार केले जात आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने भरमसाठ बील आकारण्यात येत आहे. या तक्रारी प्राप्त झाल्यावर डॉ. कोशिरे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. याप्रकरणी काही रुग्णालये दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर 100 टक्के कारवाई केली जाईल. तसेच यापुढे महापालिकेच्या कंट्रोल रुममधून रुग्णाला उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे, हेदेखील सांगितले जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

collectors review meeting regarding corona crisis
जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक.
author img

By

Published : Jul 3, 2020, 12:22 PM IST

Updated : Jul 3, 2020, 1:21 PM IST

नाशिक - कोरोना संकटात उपचाराच्या नावाखाली काही खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. या मनमानीला चाप लावण्यासाठी ऑडिट टीम (तपास पथक) तयार करण्यात आले आहे. यात २२ जणांचा समावेश आहे. पथकाच्या माध्यमातून रुग्णांना आकारण्यात आलेल्या भरमसाठ बिलांचे ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

लूट करणाऱ्या रुग्णालयांचे होणार ऑडिट - जिल्हाधिकारी

तसेच तक्रारीत तथ्य निघाल्यास संबंधित रुग्णालयाचा नर्सिंग परवाना रद्द करुन थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नाशिक शहर आणि जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली.

हेही वाचा - देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...

खासगी रुग्णालयाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरऐवजी थेट अतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार केले जात आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने भरमसाठ बील आकारण्यात येत आहे. या तक्रारी प्राप्त झाल्यावर डॉ. कोशिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी काही रुग्णालये दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर 100 टक्के कारवाई केली जाईल. तसेच यापुढे महापालिकेच्या कंट्रोल रुममधून रुग्णाला उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे, हेदेखील सांगितले जाईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

हॉस्पिटलमध्ये रुग्णाला कोविड केअर सेंटर अथवा कोणत्या कक्षात दाखल करायचे हे जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेसाठी एमएचओ आणि ग्रामीण भागासाठी हा निर्णय घेण्याचा अधिकार हा डीएचओंना असेल. उपचारासाठी कसे बिल आकाराचे या माहितीचा फलक खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागावर लावणे बंधनकार असेल. बिलात थोडी फार तफावत असू शकते. मात्र, लूटमार केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाईल, अशी इशारा जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.

Last Updated : Jul 3, 2020, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.