नाशिक - जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रभाव होळी उत्साहात देखील पाहायला मिळाला. कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, नाशिकमध्ये होळीनिमित्त कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. मखमलाबाद नाका परिसरातील कैलास मित्र मंडळाच्या वतीने ही अनोखी होळी साजरी करण्यात आली.
हेही वाचा - इगतपुरील्या विपश्यना केंद्रातील पुढील सत्र बंद ठेवा, भुजबळांचे आदेश
यावेळी कोरोना विषाणू देशात पसरू नये, असे साकडं घालण्यात आले. होळीच्या सणाला भारतीय संस्कृतीत आणि हिंदु धर्मात वेगळे असे महत्व आहे. होळीमध्ये दहन केली जाणारी वाईट गोष्ट पृथ्वीवरून नामशेष होते, असे भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कोरोनो नष्ट व्हावा, यासाठी त्याचे दहन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.