ETV Bharat / state

नाशिकमध्ये धाडसी घरफोडी; अवघ्या २० मिनिटात लांबवले ५ लाखांचे सोने

लेखानगर परिसरात भरदुपारी अवघ्या २० मिनिटात चोरट्यांनी ५ लाखाचे सोनं लांबविल्याची घटना समोर आली आहे. सिमेंस कॉलनीमधील काशीनाथ जोशी यांच्या घरामध्ये ही चोरी झाली आहे. या चोरीत चोरट्यांनी १५ तोळे सोनं लपास केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोरांचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 26, 2019, 6:17 PM IST

नाशिक - गेल्या काही दिवसापासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. अश्यावेळी लेखानगर परिसरात भरदुपारी अवघ्या २० मिनिटात चोरट्यांनी ५ लाखाचे सोनं लांबविल्याची घटना समोर आली आहे. सिमेंस कॉलनीमधील काशीनाथ जोशी याच्याघरामध्ये ही चोरी झाली आहे. या चोरीत चोरट्यांनी १५ तोळे सोनं लपास केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोर

चोरीचे सर्व दृश्य बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. एका कारमधुन आलेल्या तिघाजणांनी ही चोरी केली आहे. दोन चोरांनी रॉडने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून १५ तोळे सोने घरातल्या पिशवीत भरले. त्याच वेळी जोशी काका सुद्धा घराच्या दिशेने चालत येत होते. त्यांना पाहून कारमधील तिसऱ्या चोराने हॉर्न वाजवत दोघा साथीदारांना पळण्याचा इशारा दिला. चोरटे जेव्हा घरातून बाहेर आले तेव्हा त्यांची जोशी काकांशी नजरानजर झाली. त्यानंतर चोरटे सोनं घेऊन तेथून फरार झाले.

ही घरफोडी करण्याअगोदर चोरट्यांनी घराची पूर्णपणे रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जोशी दाम्पत्य रोज काही वेळासाठी बाहेर जातात. चोरट्यांना हे समजल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांनी चोरीचा प्लॅन आखला असवा, असा पोलिसांनी अदाज व्यक्त केला आहे. पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Intro:गेल्या काही दिवसापासून अंबड पोलीस स्टेशन हद्दीत घरफोड्यांच प्रमाण वाढत आहे मात्र दुसरीकडे अंबड पोलीस सर्व काही शांतता असल्याचा गवगवा करत आहे

Body:लेखानगर परिसरात भर दुपारी अवघ्या वीस मिनिटात चोरट्यांनी पाच लाखचं सोन लाबवलय आणि ही सर्व दृश्य बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले सिमेन्स काँलनी मधील काशीनाथ जोशी याच्याघरामध्ये ही हायटेक चोरी झालीये एका कारमधुन आलेल्या तिघांजणांनी ही चोरी केलीय कारमधुन उतरून तीन चोर आले दोघा जणांनी राँडने घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला कपाटाचे कलुप तोडुन 15 तोळे सोन घरातल्या पिशवीत भरले त्याच वेळी जोशी काका घराच्या दिशेने चालत येत असताना कार मधील तिसऱ्या चोराला दिसले कार मधील चोराने हाँर्न वाजवत दोघा साथीदारांना पळण्याचा इशारा दिलाय चोरट्यांनी घरातुन बाहेर येताच जोशी काका व चोरट्यांची नजरानजर झाली आणि चोरटे सोन घेऊन फरार झाले

Conclusion:ही घरफोडी करण्याच्या आधी चोरट्यांनी पूर्णपणे रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जोशी दांपत्य रोज त्यावेळी काही वेळासाठी बाहेर जातात चोरट्यांना हे समजल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांनी चोरीचा प्लॅन आखला असवा असा पोलिसानी अदाज व्यक्त केलाय पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.