ETV Bharat / state

नाशिकमध्ये आढळला इतिहासकालीन भुयारी मार्ग - Narayan Maharaj

नाशिकच्या चांदोरीमध्ये इतिहासकालीन भुयारी मार्ग आढळून आला आहे.

भुयारी मार्ग
author img

By

Published : Jul 21, 2019, 11:53 PM IST

नाशिक - चांदोरी येथे नारायण महाराज पटांगणाच्या बाजूला खंडेराव महाराज मंदिराजवळ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास कामासाठी खोदकाम करताना एक भुयार आढळून आले आहे. या भुयारामध्ये एक तळघर आहे. या तळघराची भिंत चुना आणि शिवकालीन विटांपासून बनवलेली आढळून आली आहे.

श्रीराम मंदिरापासून नदीपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते, तो हाच मार्ग असावा, अशी शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे. हा भुयार सदृश मार्ग शेकडो वर्षांपुर्वीचा असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बद्दलची माहिती होताच अनेकांनी धाव घेऊन पाहणी केली. चांदोरी गावास अनेक ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व खात्याने या सर्व गोष्टींचा विकास करावा. त्या माध्यमातून पर्यटनाचा माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबर ऐतिहासिक माहिती समोर येऊ शकते, अशी भावना येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली.

गावाला लाभला आहे ऐतिहासिक वारसा

चांदोरी गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून या गावात अनेक प्राचीन मंदिर आहेत. यात महादेव मंदिर, जहागिदार वाडा आणि श्रीराम मंदिर याचा यात समावेश आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील चांदोरी हे अनेक ऐतिहासिक वारसा असलेलं गाव असून अनेक प्राचीन मंदिर आहे महादेव मंदिर ,जहागिदार वाडा,सावकार वाडा या बरोबरच श्रीराम मंदिर असलेलं मठकरी वाडा असुन
नारायण महाराज पटांगणाच्या बाजूला खंडेराव महाराज मंदिराजवळ तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत विकास कामाकरिता खोदकाम करताना एक भुयार आढळून आले आहे या भुर्यारा मध्ये ऐक तळघर असुन सदर या तळघराची भिंत चुना व शिवकालीन विटांपासून बनवलेली आढळून आली आहेBody:श्रीराम मंदिरा पासून नदी पर्यंत भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते तो हाच मार्ग असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.पुरातत्त्व विभागाकडून याबाबत संशोधन करण्याची गरज असल्याच सागितलय चांदोरी येथे असलेला हा भुयार सदृश मार्ग शेकडो वर्षांपुर्वीचा असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या बद्दलची महिती होताच अनेकांनी धाव घेऊन पाहणी केली.Conclusion:चांदोरी गावास अनेक ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व खात्याने या सर्व गोष्टींचा विकास करावा त्या माध्यमातून पर्यटनाचा माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्या बरोबर ऐतिहासिक माहिती समोर येऊ शकते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.