नाशिक Hemant Parakh Kidnapping: बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांना शनिवारी रात्री काही गुंडांनी वाहनातून त्यांच्या घरासमोरून चारचाकीत कोंबून सुसाट वेगाने पळून नेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Businessman Hemant Parakh) घराजवळून हेमंत पारख यांचे अपहरण झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. (Hemant Parakh release near Surat) घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांकडून विविध पथके रवाना: अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. त्याचबरोबर सीसीटीव्हीही तपासण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरासह इंदिरानगर भागात खळबळ उडाली. पारख यांचे अपहरण पूर्व वैमन्यस्यातून झाले का, त्यांचे कुणाशी भांडण होते का? कोणी धमकी दिली होती का? हा अँगलही पोलीस तपासत करत असतांना त्यांना अपहरण केलेल्यांनी सुरत येथे सोडून पळ काढला.
- खंडणी घेऊन सुटका? पोलिसांना मध्यरात्री पारख यांचे शेवटचे लोकशन अंबेबहुला मिळाले होते. त्यानंतर पोलिसांचा शोध सुरू असताना त्यांना सोडून देण्यात आल्याचे कळाले. पारख यांच्याकडून खंडणी घेऊन ही सुटका केल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. पारख यांना सोडून दिल्यानंतर अपहरण करणाऱ्यांनी पळ काढला.
अनेक प्रश्न अनुत्तरीत: मात्र त्यांचं अपरहरण कुणी केलं? कशासाठी केलं? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आज पारख कुटुंबीयांची भेट घेतली. यासंबंधी वरिष्ठ अधिकऱ्यांशी बोलणार असल्याचंही छगन भुजबळ यांना सांगितलं. पारख यांचे डोळे बांधलेले होते. त्यामुळे अपहरणकर्ते कोण होते कळू शकलेले नाही. पण ते कुठल्या राज्यातील होते हे लक्षात आलं आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासोबत बोलणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
जागेच्या वादातून अपहरणाचा संशय: हेमंत पारख यांचं जागेच्या वादातून खंडणीसाठी अपहरण झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता पारख यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांचीच माहिती घेतली जात आहे. घटनेच्या वेळेस सुरुवातीला एका बुलेटवरून एक जण रेकी करून गेला होता. पारख हे घराबाहेर उभे होते. त्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या दोन कार आल्या होत्या. शस्त्राचा धाक दाखवून पारख यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबत घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.
हेही वाचा: