ETV Bharat / state

Hemant Parakh Kidnapping Case : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा उलगडा;1 कोटी 42 लाखांसह चार संशयित अटकेत

Hemant Parakh Kidnapping Case : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा उलगडा नाशिक पोलिसांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 42 लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय.

Hemant Parakh
Hemant Parakh
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 5:56 PM IST

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची प्रतिक्रिया

नाशिक Hemant Parakh Kidnapping Case : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणातील चार संशयितांना जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 1 कोटी 42 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दोन संशयित अद्याप फरार असून त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

2 कोटी रुपयांची खंडणी उकळली : शनिवार (दि 2 सप्टेंबर) रोजी रात्री नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. राजस्थान येथील संशयित आरोपी महेंद्र बिष्णोई यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं पारख यांचं अपहरण करून 2 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

आरोपी राजस्थानमधील असल्याचं निष्पन्न : गुन्हे शाखा युनिट क्र. 1, 2 तसंच इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या एका पथकाची आरोपींचा शोध घेण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी महेंद्र बिश्नोई यानं त्याच्या साथीदाराच्या मदतीनं हेमंत पारख याचं अपहरण करून खंडणी उकळल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढमाळ यांनी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे हेमंत तोडकर यांच्या टीमला राजस्थानात पाठवलं होतं.

एक कोटी 33 लाख रुपये जप्त : तेथून पोलिसांनी संशयित महेंद्र उर्फ नारायणराम बाबुराम बिश्नोई, पिंटू उर्फ देवीसिंग बद्रिसिंग राजपूत, रामचंद्र ओमप्रकाश बिश्नोई यांना ताब्यात घेतलं. महत्त्वाचं म्हणजे, या अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार इगतपुरी तालुक्यातील लहांगेवाडी येथील अनिल भोरू खराटे असल्याचं समोर आलंय. खराटे यानं गुन्ह्याचा कट रचला होता. हेमंत पारेक यांची सर्व माहिती आरोपींना दिली होती, असंही समोर आलंय. पोलिसांनी संशयितांकडून मागितलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीपैकी एक कोटी 33 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

कशी घडली घटना : व्यवसायिक हेमंत पारख यांचं शनिवार (दि.2 सप्टेंबर) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराबाहेरून अपहरण करण्यात आलं होतं. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना नंबरप्लेट नसलेल्या गाडीत बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर रविवार (दि.3 सप्टेंबर) रोजी रविवारी पहाटे हेमंत पारख सुखरूप घरी परत आले होते.

हेही वाचा -

  1. Hemant Parakh Kidnapping: अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक हेमंत पारख यांची सुरतजवळ सुटका. नेमकं काय घडलं?
  2. Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक, गुन्ह्याचं कारण समजून बसेल धक्का
  3. MP Firing : गाई चारण्यावरून दोन गटात वाद, अंदाधुंद गोळीबारात ५ जणांचा मृत्यू, अनेक जखम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.