नाशिक - जिल्ह्यात अनेक गावांना परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. दुपारपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून, अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
शनिवारी दिंडोरी आणि इगतपुरी तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यूही झाला होता. रविवारी देखील नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने रविवारची सुटी साधत हजारो भाविक नाशिकची ग्रामदेवता कालिका देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मात्र, जोरदार पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा - नाशिकमध्ये अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू
परतीच्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, बाजरी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.