ETV Bharat / state

निफाडमध्ये गारपीटीमुळे द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी - द्राक्षांच्या बागा उध्वस्त नाशिक

निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. महत्त्वाचे समजले जाणारे द्राक्ष हे पीक मोठ्या संकटात सापडले आहे. दोन तासांहून अधिक काळ झालेल्या पावसाने मका, सोयाबीन ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत.

निफाडमध्ये गारपीटीमुळे द्राक्षांच्या बागा उध्वस्त; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
author img

By

Published : Oct 30, 2019, 3:26 PM IST

नाशिक - निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. महत्त्वाचे समजले जाणारे द्राक्ष हे पीक मोठ्या संकटात सापडले आहे. दोन तासांहून अधिक काळ झालेल्या पावसाने मका, सोयाबीन ही पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत.

निफाडमध्ये गारपीटीमुळे द्राक्षांच्या बागा उध्वस्त; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

हेही वाचा - युतीच्या सत्तावाटपाचे गणित अमित शाह यांनाच माहिती - चंद्रकांत पाटील

निफाड तालुक्यासह वनसगाव, सारोळे, खडकमाळेगाव, खानगाव,कोटमगाव, उगांव, शिवडी, खेडे वनसगाव, सारोळे नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपूर, कोळवाडी, शिवरे, भागात सोमवारी दिवसभर कडक‌ उन्हानंतर सायंकाळी सहा वाजता विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला. गारपिटीने सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. गारपिटीने द्रक्षाचे घड गळून पडले आहेत.

सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने पानांवर व घडांवर करपा आणि डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ व घडकुजाचे नुकसान होत आहे.

दररोज हजार दोन हजार रुपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची आणि पुन्हा पावसाने त्यावर पाणी‌ फेरायचे हे नित्याचे झाले असल्याचे शेतकरी म्हणत होते. त्यामुळे द्राक्षबागेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामधून फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होत आहे. बहुतांश वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत असल्याने उत्पादक आता हतबल झाले आहेत. महिनाभरापासून सतत ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसाने द्राक्षबागांवर येणाऱ्या संकटातून उत्पादकाला हातभार लावण्यासाठी‌ शासनाने केवळ पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडण्यापेक्षा द्राक्ष पिक विमा योजनेत अमुलाग्र बदल घडवून आणत छाटणीनंतरच्या 150 दिवसात विमा संरक्षण कसे मिळेल अशी व्यवस्था करावे. असे द्राक्ष उत्पादक शेतकरी राहुल कापसे यांनी भावना व्यक्त केली.

हेही वाचा - दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागारपदी नियुक्ती

Intro:

पूर्वी शेतकरी म्हणत असे इडा पिडा टळो अन बळीचे राज्य येवो' असे म्हटले जात मात्र निफाड तालुक्यात बळीराजामागे लागलेली निसर्गाची अवकाळी पाऊसाची,गारपीट ची इडा पिडा काही केल्या टळेना अशी अवस्था झाली आहे. विशेषता तालुक्यात महत्वाचे पिक समजले जाणारे द्राक्ष पंढरीतील द्राक्षबाग मोठ्या संकटात सापडले आहे.

Body:

निफाड तालुक्यासह द्राक्ष पंढरीतील गावे वनसगाव,सारोळे, खडकमाळेगाव, खानगाव,कोटमगाव,उगांव, शिवडी, खेडे वनसगांव, सारोळे नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपुर, कोळवाडी, शिवरे, भागात सोमवारी दिवसभर कडक‌ उन्हानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गाराव पाऊस सुरु झाला आहे. सुमारे 2 तासाहुन अधिक काळ पाऊसाचा जोर कायम राहिला. या पावसाचा गारपिटीने सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.गारपिटीने घड गळून पडले तर काही ठिकाणी सोयाबीन, मका पीक ही उध्वस्त झाले आहे.

Conclusion:इडा पिडा टळो अन बळीचे राज्य येवो' असे म्हटले जाते मात्र निफाड तालुक्यात बळीराजामागे लागलेली अवकाळी पाऊसाची इडा पिडा काही केल्या टळेना अशी अवस्था झाली आहे. विशेषता तालुक्यात महत्वाचे पिक समजले जाणारे द्राक्षबाग मोठ्या संकटात सापडले आहे.

निफाडसह परिसरातील उगांव शिवडी, खेडे वनसगांव, सारोळे नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपुर, कोळवाडी, शिवरे, भागात सोमवारी दिवसभर कडक‌ उन्हानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला आहे. सुमारे सव्वा तासाहुन अधिक काळ पाऊसाचा जोर कायम राहिला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोर्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पाऊसाने होत आहे.

दररोज हजार दोन हजार रुपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी‌ फेरायचे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यातुन फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालविणे मुश्किल होत आहे. बहुतांश वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणि करावी लागत असुन उत्पादक आता हतबल झाले आहेत. महिनाभरापासुन सतत पाऊसाच्या आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नविन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे.

सोमवारी सायंकाळी सुर असलेल्या पाऊसा‌ने द्राक्षबागंचे मोठे नुकसा‌न केले आहे. नेमके किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज सकाळनंतर येईल असे शिवडीचे द्राक्ष उत्पादक लाला कातकाडे यांनी सांगितले. तर सततच्या पाऊसाने द्राक्षबागांवर येणाऱ्या संकटातून उत्पादकाला हातभार लावण्यासाठी‌ शासनाने केवळ पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडण्यापेक्षा द्राक्ष पिक विमा योजनेत अमुलाग्र बदल घडवून आणत छाटणीनंतरच्या एकशे पन्नास दिवसांत विमा संरक्षण कसे मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी, असे द्राक्ष उत्पादक शेतकरी राहुल कापसे यांनी भावना व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.