ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस; वादळी वार्‍यामुळे शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामुळे दिंडोरी तालुक्यातील साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Nashik heavy rain
दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस
author img

By

Published : Jun 2, 2020, 8:16 PM IST

दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील ननाशी परिसरात पावसाने वादळी वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली. या वादळामुळे दिंडोरी तालुक्यातील साद्राळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ननाशी परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह एक तास पाऊस बरसला. जोरदार वादळी वाऱ्यांमुळे साद्राळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीवरील सर्व पत्रे उडून गेले. तसेच किचन शेड, स्वच्छतागृह यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोबतच शाळेतील संगणक संच आणि टीव्ही संचामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचेही नुकसान झाले असून शाळेतील स्टेशनरी पूर्ण भिजून गेली आहे. सुदैवाने शाळेच्या आसपास कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे.

या नुकसानीची तलाठी गायकर, ग्रामसेवक मोरे आदींनी पाहणी करून पंचनामा केला आहे. त्यात अंदाजे दोन लाख पच्याऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.