येवला (नाशिक) - तालुक्यातील अंकाई किल्ल्याला सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे समोर आले आहे. आगीचे लोळ पसरत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांना दिसताच त्यांनी वन विभागाला घटनेची माहिती त्वरित दिली.
यानंतर वन विभागाच्या कर्मचारी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने, झाडाच्या पानांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. किल्ल्याच्या परिसरात वनक्षेत्र असल्याने आणि वाळलेले गवत असल्याने आग भडकली आणि अंधारही पडल्याने आग विझवण्यास अडथळा येत आहे. तरी बऱ्यापैकी आग आटोक्यात आणण्यास यश आले आहे.
हेही वाचा - या काळातही लहान मुलांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रयत्न करा - जागतिक आरोग्य संघटना