ETV Bharat / state

'म्युकरमायकोसिस' आजारावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज - भुजबळ - छगन भुजबळ लेटेस्ट न्यूज नाशिक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र तरी देखील कोरोनाची तिसरी लाट, आणि त्यानंतर म्युकरमायकोसिस आजाराचा लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन, प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोना आणि म्युकरमायकोसिच्या उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

'म्युकरमायकोसिस' आजारावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

author img

By

Published : May 29, 2021, 7:10 PM IST

नाशिक - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र तरी देखील कोरोनाची तिसरी लाट, आणि त्यानंतर म्युकरमायकोसिस आजाराचा लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन, प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोना आणि म्युकरमायकोसिच्या उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक डॉक्टर्स, बेडस् व औषधे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. तसेच या आजाराचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आल्याने रुग्णाला या योजनेचा लाभ होणार आहे. याचप्रमाणे लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता, त्यांच्यासाठी आवश्यक असणारा औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्याच्या काळात सुरू असलेली कोविड केअर सेंटर्स बंद न करता, त्यांची योग्य निगा राखून, त्यांना नियमित सॅनिटाईज करण्यात यावे अशा सूचना देखील देण्यात आल्याची माहिती भूजबळांनी दिली.

छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद

आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना उपचार व लसीकरणाच्या अनुषंगाने तेथील स्थानिक नागरिक, लोक कलावंत, शिक्षक अशा व्यक्तींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. त्याचप्रमाणे यासाठी आयुर्वेदीक डॉक्टरांचे देखील सहकार्य घेण्यात यावे. जेणेकरून आदिवासी भागातील नागरिकांच्या मनातील लसीकरणा विषयीचे गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

शासनाच्या सूचना आल्यानंतर लॉकडाऊनवर निर्णय - भुजबळ

कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताना जीवनावश्यक वस्तुंच्या व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना देखील वेळेचे व कोरोना विषयक नियमांचे कोटेकोरपणे पालन करून. ठराविक वेळेसाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल. याबाबत राज्य शासनाच्या सूचना आल्यानंतर त्याप्रमाणे जिल्हास्तरावर योग्य ते निर्णय घेतले जातील असेही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. तसेच बाजार समित्यांमध्ये सध्या कार्यरत असलेली कोरोना विषयक नियमावली व चाचण्या करणे सुरूच ठेवावे, यामध्ये पोलिसांनी लक्ष घालावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेवून, त्यांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांना नाशिक व मालेगाव महानगरपालिकेने परवानगी द्यावी, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच म्युकरमाकोसिसच्या उपचार व शस्त्रक्रीयेसाठी सहा खासगी नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

6 रुग्णालयांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश

या बैठकीत म्युकरमायकोसिस आजाराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिस आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व या आजारावरील औषोधोपचार वेळेत उपलब्ध होण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराच्या उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्‍ह्यातील 6 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल या दृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ऑक्सिजनच्या कायमस्वरूपी सुविधेसाठी जिल्ह्यात 55 नवीन ऑक्सिजन प्रकल्प तयार करण्यात येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.