नाशिक - मालेगावातील रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात टेली रेडियोलॉजी आजपासून सुरू करणार असून पुढील दोन दिवसांत ती कार्यान्वित होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात हे सुरु करणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आजाराचे निदान करण्यासाठी आणि औषध देण्यासाठी याची मोठी मदत होण्यासाठी नाशिमध्ये टेलीमेडिसिनची व्यवस्था करत आहे. यामध्ये नाशिकचे उत्तमोत्तम डॉक्टर घेऊन गंभीर रुग्णाला उपचाराबाबत सूचना देतील, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
मालेगावातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी आवश्यक ते डॉक्टर्स व स्टाफ भरण्याचे आदेश यावेळी जिल्हा यंत्रणेला देण्यात आले. खासगी डॉक्टरांनी आपली सेवा नॉन कोव्हिड रुग्णांना द्यावी, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले. जे डॉक्टर सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर करत त्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना यावेळी मंत्री टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
काय आहे टेली रेडियोलॉजी..?
कोरोनाग्रस्तांमध्ये दम लागण्याचा प्रमाण किंवा न्युमोनिया होणाचा प्रमाण जास्त असतो. न्युमोनियाचा निदान करण्यासाठी एक्सरे काढावे लागतात. पण, रिडीओलॉजीस्ट त्यांच्या एक्सरेची माहिती त्याचवेळी स्क्रिनवर पाहून लगेचच देणार आहेत. यावरुन रुग्णाला कोणत्या प्रकारच्या उपचाराची गरज आहे, याचे निदान लवकरच होतील आणि रुग्णांवर योग्यवेळी योग्य उपचार होतील.
हेही वाचा - येवल्यातून शेकडो परप्रांतीय मजुरांच्या परतीसाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था