ETV Bharat / state

अपंगत्वावर मात करत सरपंचपदाची सांभाळताहेत धुरा; नाशिकच्या तरुणीची प्रेरणादायी कहानी - नाशिक प्रेरणादायी बातमी

दिंडोरी तालुक्यातील दहेगाव वागळूद येथील कविता भोंडवे यांनी हे शक्य करून दाखवले आहे. या तरुणीने नुसता गावाचा कारभार रूळावर आणला नाही, तर गावातील अवैद्य धंद्यांविरुद्ध त्या उभ्या राहिल्या आणि अपंगत्वावरून हिणविल्यास मी माणूस नाही का? असा जाब विचारण्याची हिंमत तिने दाखविली.

अपंगत्वावर मात करत सरपंचपदाची सांभाळताहेत धुरा; नाशिकच्या तरुणीची प्रेरणादायी कहानी

author img

By

Published : Nov 25, 2020, 9:32 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील दहेगाव वागळुद येथील एका महिलेने आपल्या दिव्यांग मात करत सलग दहा वर्षे गावचे सरपंचपद भूषविले असून संपूर्ण गावागाडा रुळावर आणला आहे. पोलिओमुळे अपंगत्व आलेली ३४ वर्षांची तरुणी दोन गावाचे सरपंच पद सांभाळते काय आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात कायापालट घडून आणते काय, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणारी सत्य परिस्थिती. दिंडोरी तालुक्यातील दहेगाव वागळूद येथील कविता भोंडवे यांनी हे शक्य करून दाखवले आहे. या तरुणीने नुसता गावाचा कारभार रूळावर आणला नाही, तर गावातील अवैद्य धंद्यांविरुद्ध त्या उभ्या राहिल्या आणि अपंगत्वावरून हिणविल्यास मी माणूस नाही का? असा जाब विचारण्याची हिंमत तिने दाखविली.

अपंगत्वावर मात करत सरपंचपदाची सांभाळताहेत धुरा; नाशिकच्या तरुणीची प्रेरणादायी कहानी

दहेगाव व वागळूद या दोन ग्रुप ग्रामपंचायतीच्या दिंडोरी तालुक्यातील पहिल्या दिव्यांग महिला सरपंच कविता भोंडवे यांच्या नावांची चर्चा सध्या तालुक्यातील नागरिकांमध्ये होत आहे. कारण अपंगत्वावर मात करत गावगाडा ओढत लागोपाठ दहा वर्षे गावचे सरपंचपद भूषविले. यामुळे भोंडवे यांचे कौतुक होत आहे. राजकारण्यांचा वारसा भोंडवेताईंनी आपले वडील पुंडलिक भोंडवे यांच्याकडून घेतला. पुंडलिक भोंडवे हेही लागोपाठ पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिले. परंतु सरपंचपद महिला राखीव निघाल्याने त्यांनी आपली मुलगी कवितास निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. त्यात त्यांना बहुमतांनी निवडून येण्यात यश मिळाले व तालुक्यातील पहिल्या दिव्यांग महिला सरपंचपदाचा मान मिळाला. तेव्हा कविता ताईंचे वय जेमतेम २३-२४ वर्षे होते. कुठला अनुभव नाही. तरीही न डगमगता त्यांनी गावगाडा चालविण्याचे आवाहन स्वीकारले.

दहा वर्षात भोंडवे यांनी गावातील सर्व अवैध धंदे, गरीब कुटुंबासाठी घर मंजुरी, शासनाच्या विविध योजना, गरीब जनतेसाठी विविध कर्ज योजना, गावातील रस्ते, गावातील ग्रामपंचायतीची नवीन इमारत, एकसुञी कारभार सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धती या नियोजनामुळे भोंडवे यांचे संपूर्ण जिल्हाभर नाव निघत आहे. तसेच कविता भोंडवे सरपंचपदाची धुरा हातात घेतल्यानंतर एक दिवस रस्त्याने जात असताना लोक मला म्हणायचे की हिला धड चालता येत नाही. गावगाडा चालविणार. हे शब्द माझ्यासाठी परीस ठरले. मी दोन्ही हातात कुबड्या घेऊन कारभार करू लागले. त्यामुळे दहेगाव वागळूद हे एक आदर्श गाव म्हणून तालुक्यात ओळखू लागले आहे. मी गावातील अवैध धंदे, तरुण युवा पिढी संस्कार, रस्ते, पाणी पुरवठा योजना, स्वच्छता अभियान मोहीम, गावचा एकसुत्री कारभार, गावातील एक विचार योजना इत्यादी योजना राबविल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.