नाशिक - येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे डिपॉझिटचे पैसे परत मिळावे यासाठी रुग्णांचा मुलगा आणि सामजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न आंदोलन केले होते, या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात सामजिक कार्यकर्त जितेंद्र भावे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात तासानंतर भावे यांची सुटका -
नाशिकच्या व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांकडून उपचारासाठी घेतले. डिपॉझिटचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनासमोर आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे आणि रूग्णांचा मुलगा अमोल जाधव यांनी अंगावरील कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने पैसे परत केले. या सर्व घटनेचे भावे यांनी फेसबुक लाइव्ह केले होते. या प्रकरणात हजारो नागरिकांनी भावे यांच्या आंदोलनाला पाठिबा दिला होता. या घटनेनंतर भावे यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यानतंर भावे यांच्या समर्थनार्थ शेकडो नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. तेव्हा पोलिसांनी सात तासानंतर भावे यांची सुटका केली होती.
दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल -
व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मुलगा आणि जितेंद्र भावे यांनी डिपॉझिटचे पैसे मिळावे म्हणून अर्धनग्न आंदोलन केले हा प्रकार चुकीचा आहे. तसेच त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. कोरोना काळात गर्दी करणे नियमात नसून आम्ही अमोल जाधव, भावे आणि त्यांच्या ४० समर्थका विरोधात १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. असे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सागितले.
आम्ही फक्त हक्काचे पैसे मागण्यास गेलो होतो -
आमच्यावर गुन्हे दाखल होणार नाही असे सांगत पोलिसांनी आम्हाला सोडून दिले होतो, मात्र आता समजतंय त्यांनी आमच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. पण चोऱ्या, खून केला नाही त्यामुळे कायद्याच्या चौकटीत जे होईल ते आम्हाला मान्य आहे. कालचा प्रकार अतिशय निदनिय होता, जिथे दिल्लीत आरोग्यावर १३ टक्के खर्च केला जातो. तिथे महाराष्ट्र केवळ एक टक्के खर्च करते, त्यामुळे कॉर्पोरेट हॉस्पिटल सर्वसामान्य नागरिकांची लूट करत असून पोलीस चोरांना सोडून संन्यासाला पकडत आहेत. हे चुकीचे आहे असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्याच्या परिस्थितीवर चर्चा