ETV Bharat / state

'एचएएल' कामगार संघटनेचे प्रलंबित वेतन करारासाठी उपोषण; लक्ष वेधण्यासाठी मुंडन आंदोलन - Rakesh Shinde

एचएएल कामगार संघटनेचे प्रलंबित वेतन करारासाठी साखळी उपोषण सुरू आहे. आज संघटनेकडून मुंडन आंदोलन करण्यात आले. जर लवकरात लवकर यावर तोडगा निघाला नाही. तर लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

एचएएल कामगार संघटनेचे मुंडन आंजोलनावेळचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 25, 2019, 11:58 AM IST

नाशिक - प्रलंबित वेतन करार पूर्ण करावा या मागणीसाठी नाशिकमधील एचएएल कामगारांचे साखळी उपोषण सुरू आहे. याच साखळी उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आज येथील कामगारांनी एचएएल प्रवेशद्वारावर मुंडन आंदोलन केले. मुंडन आंदोलन करूनही मागणी पूर्ण न झाल्यास लाक्षणिक संपाचा इशाराही या कामगार संघटनांनी दिला आहे.

पगारवाढीसाठी आंदोलन करताना एचएलए कामगार

एचएएल म्हणजे भारतीय वायुसेनेचा कणा आहे. अनेक युद्धांमध्ये एचएएलच्या लढाऊ विमानांनी भारताला खंबीर साथ दिली आणि भारताने युद्धही जिंकले. त्याच एचएएलच्या कामगारांना आज पगारवाढीसाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. १ जानेवारी, २०१७ पासून कामगारांचा वेतन करार व्हायला हवा होता. परंतु जवळपास ३० महिन्यांपासून यावर कोणतीही समाधानकारक वाटचाल होत नाही. त्यामुळे आज सकाळी सात वाजेपासून कामगार संघटनेचे प्रतिनिधी साखळी उपोषणाला बसले आहेत.

कामगार संघटना २ दिवस उपोषण करणार असून व्यवस्थापनाने जर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर १८ जुलै रोजी एचएएल कामगार संघटना एक दिवसीय लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती संघटनेचे नेते सचिन ढोमसे आणि भानुदास शेळके यांनी दिली आहे

Intro:प्रलंबित वेतन करार पूर्ण करावा या मागणीसाठी नाशिक मधील HAL कामगारांचं साखळी उपोषण सुरू आहे याच साखळी उपोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आज येथील कामगारांनी HAL प्रवेशद्वारावर मुंडन आंदोलन केले मुंडन आंदोलन करूनही मागणी पूर्ण न झाल्यास लाक्षणिक संपाचा इशारा हि या कामगार संघटनांनी दिला आहे

Body:HAL म्हणजे भारतीय वायुसेनेचा कना अनेक युद्धांमध्ये HAL च्या लढाऊ विमानांनी भारताला खंम्बीर साथ दिली आणि युद्धही जिकली त्याच HALच्या कामगारांना आज पगारवाढीसाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे दि.1/1/1017पासुन कामगारांच्या वेतन करार व्हायला हवा होता तरीही जवळपास तीस महिन्यापासून यावर कुठलाही समाधानकारक वाटचाल होत नाहीये त्यामुळे आज सकाळी सात वाजेपासून कामगार संघटनेचे प्रतिनिधी साखळी उपोषणाला बसले आहेत

Conclusion:कामगार संघटना दोन दिवस उपोषण करणार असून व्यवस्थापनाने जर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर 18/7/2019 रोजी HAL कामगार संघटना एक दिवसीय लाक्षणिक संपा करणार असल्याची माहिती संघटनेचे नेते सचिन ढोमसे आणि भानुदास शेळके यांनी दिलीय
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.