नाशिक- परराज्यातून बेकायदेशीर बंदुकीची तस्करी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नाशिक पोलिसांनी जेरबंद केल आहे. त्यांच्याकडून चार गावठी पिस्टलसह 8 जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. बंदुक तस्करांचे नाशिक बॉर्डरपलीकडे अड्डे असून ते लवकरच उद्धवस्त केले जाईल, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !
गुन्हे शाखा युनिट 1 मधील पोलीस हवालदार येवाजी महाले यांना मिळालेल्या माहितीवरुन रोकडोबा वाडी, शिवाजी पुतळा जवळ उपनगर येथे दोन जण गावठी पिस्तूल घेऊन विक्रीसाठी येणार होते. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना दिली. त्यानंतर या परिसरामध्ये सापळा लावण्यात आला. बातमीदाराने इशारा करताच लपून बसलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळील पळून जाणाऱ्या आऱोपींना पोलिसांनी पकडले. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले. यात राहुल सोनवणे (वय 27 वर्ष) आणि वतन ब्रह्मानंद वाघमारे (वय 31) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा- 'माझ्यावरील कारवाईमुळे अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा'
त्याच्याकडून पोलिसांना प्रत्येकी एक गावठी पिस्तूल व प्रत्येक मॅक्झिनमध्ये दोन-दोन जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपींनी उमराठी मध्यप्रदेश येथून 4 पिस्टल आणले होते. पोलिसांनी सुमारे एकूण 4 गावठी पिस्तूल 8 जिवंत काडतुसे, दोन मोबाईल अशा एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या आधी देखील संशयित राहुल सोनवणे वर दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी अशा प्रकारांचे एकूण अठरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी वतन वाघमारे याच्यावर जबरी चोरी, घरफोडी असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत नाशिक शहरात जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्राचा पुरवठा हा महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळ असलेल्या गावातून होत असल्याचे पुढे आले आहे. पिस्टल पुरवठा करणाऱ्या व्यक्तीची माहिती देखील मिळाली आहे. त्यांच्यावर लवकरच धडक कारवाई करुन तेथील अड्डे उध्वस्त करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.