ETV Bharat / state

नाशिकमध्ये अतिरिक्त 640 खाटांच्या व्यवस्थेसह आवश्यक सुविधांमध्ये वाढ - पालकमंत्री छगन भुजबळ - नाशिक कोरोना घडामोडी

जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी 110 खाटांची क्षमता होती. तेथे आता 90 खाटा वाढविल्याने 200 खाटांची क्षमता झाली आहे. तसेच बिटको रुग्णालयात 300, तसेच नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत व भक्तनिवास या कोविड केंद्रामध्ये 250 अशा एकूण 640 अतिरिक्त खाटांची वाढ करण्यात येणार आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Apr 4, 2021, 6:39 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण 640 अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह आवश्यक वैद्यकीय सुविधांमध्येही वाढ करण्यात आली असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बिटको व जिल्हा सामान्य रुग्णालयाला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी 110 खाटांची क्षमता होती. तेथे आता 90 खाटा वाढविल्याने 200 खाटांची क्षमता झाली आहे. तसेच बिटको रुग्णालयात 300, तसेच नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत व भक्तनिवास या कोविड केंद्रामध्ये 250 अशा एकूण 640 अतिरिक्त खाटांची वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मविप्र आणि एसएमबीटी रुग्णालय अधिग्रहीत करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातूनही खाटा उपलब्ध होतील, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

रोज दोनशे रुग्णांचे स्कॅनिंग होणार..

बिटको रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाच्या सिटी स्कॅन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मशिन लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार असून दिवसभरात दोनशे रुग्णांचे स्कॅनिंग होणार आहे. तसेच बिटकोमध्ये लवकरच प्रति दिवस पाच हजार घशातील स्त्रावाचे नमुने तपासले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचारांबरोबरच ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नवीन 250 लिटर क्षमतेचे 27 ड्युरा सिलेंडर मागविण्यात आले आहेत. या सिलेंडरमुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे सुलभ होणार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांचे नियोजन प्रशासन आपल्या स्तरावरून करत आहे. तरीही कोरोनासारख्या संकटकाळात खासगी डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना आपली सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले आहे.

गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड कक्षाचीही पाहणी...

व्हेंटिलेटरबाबत योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी व्हेंटिलेटर पोहचविण्यात आले असून 10 ते 12 व्हेंटिलेटर आपत्कालीन परिस्थितीतीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. भुजबळ यांनी बिटको रुग्णालयातील सिटी स्कॅन, एमआरआय कक्ष, कोविड कक्ष, प्रयोगशाळेस भेट दिली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा व अतिरिक्त वाढविण्यात आलेल्या खाटांचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड कक्षाचीही पाहणी केली. यावेळी भुजबळ यांनी टाळेबंदी होणार की नाही हे माहीत नाही, पण करायचा असेल तर नागरिकांना आधी थोड्या दिवसाचा कालावधी देण्यात यावा, असेही भुजबळ यांनी यावेळी मत व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.