नाशिक - खराब रस्ते म्हणा किंवा खड्ड्यांचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी आजपर्यंत आपल्या कानी पडल्या असतील. मात्र, नाशिकमध्ये पार पडलेल्या एका लग्नात नवरदेवाने ( Groom Demand On Pothols ) चक्क मला लग्नात काहीही नका देऊ पण गावाचे रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी केल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
खड्डेमय झालेल्या 3 किमी रस्त्यावर खूप त्रास - नादगांव तालुक्यातील बोलठाण येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश रिंढे यांची कन्या ऋतुजा हीचा विवाहसोहळा औरंगाबाद जिल्ह्यातील गोपाळवाडी येथील जयेश जगताप सोबत जमल्या नंतर नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी येत असताना त्यांना मनेगाव फाटा ते बोलठाण या खड्डेमय झालेल्या 3 किमी रस्त्यावर खूप त्रास झाला. या त्रासामुळे सर्वच मेटाकुटीला आले होते. विवाह प्रसंगांमध्ये पायघड्या टाकण्यात आल्यानंतर नवरदेव रुसतो व त्यानंतर त्याचा रुसवा दूर करण्यासाठी सासू सासरे त्याची मागणी पूर्ण करतात. मात्र, या नवरदेवाने मला काही नको आपण फक्त मनेगाव फाटाचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशी मागणी करून सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला नवरदेवाने हात घातला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझ्या वडीलांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खड्डे किती घातक आहे, याची मला जाणीव असल्यामुळे मी ही मागणी केल्याचे नवरदेव जयेशने सांगितले आहे.
दुरुस्तीच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने - औरंगाबाद-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर हा रस्ता असून तो नादगाव तालुक्याच्या हद्दीत येतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. सद्या हा रस्ता इतका खड्डेमय झाला आहे की, वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे रोज अपघात होतात. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा - Naxals Arrest In Gadchiroli : लाखोंची बक्षिसे असलेल्या चार नक्षवाद्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या