ETV Bharat / state

कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

कोरोनामुळे जागतिक बाजारपेठा बंद पडल्या आहे. यामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. स्थानिक बाजारपेठा खुल्या असूनही द्राक्ष खरेदी करायला ग्राहकच नसल्याने राज्यातील हजारो हेक्टरवरील लाखो टन द्राक्ष फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Grapes
द्राक्ष उत्पादन
author img

By

Published : Mar 26, 2020, 10:07 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. अनेक संकटांवर मात करून उभे केलेले द्राक्ष पीक विक्रीच्या तोंडावर शेतातच पडून आहे. कोरोनामुळे जागतिक बाजारपेठा बंद पडल्या आहे. स्थानिक बाजारपेठा खुल्या असूनही द्राक्ष खरेदी करायला ग्राहकच नसल्याने राज्यातील हजारो हेक्टरवरील लाखो टन द्राक्ष फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

नाशिकच्या मातोरी गावातील सुदाम पिंगळे यांची तब्बल आठ एकर द्राक्ष शेती ही एक्सपोर्ट क्वालिटीची आहे. आस्मानी आणि सुल्तानी संकटांचा सामना करत पिंगळे यांनी द्राक्ष बागेतील पीक जिवंत ठेवले. मात्र, आता कोरोनाच्या जागतिक संकटामुळे पिंगळे यांची द्राक्ष खरेदी करण्यास कुणी तयार नाही. जागतिक बाजारपेठा बंद आहेत त्यामुळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी शेतकऱयांची द्राक्ष खरेदी करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा - Coronavirus : नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू - उद्धव ठाकरे

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या कृषीमंत्र्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. द्राक्ष खरेदी करण्यासाठी येणारे कंटेनर आणि विक्रीसाठी जाणाऱ्या वाहनांना परवाने देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, ही सुविधा उपलब्ध होऊनही बाजारपेठा आणि ग्राहकच नसल्याने यावर ठोस तोडगा निघू शकला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.