नाशिक - कांद्याचे भाव घसरल्यामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र, या सर्व परिस्थितीकडे राज्य सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केला. तसेच राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे, असेही ते म्हणाले. रघुनाथ पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पाटील पुढे म्हणाले, दुधामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भेसळ होते. अन्न प्रशासन विभाग यासंदर्भात कारवाई करत नाही. या भेसळीमुळे कॅन्सरसारखे मोठे आजार होतात म्हणून याबाबत लवकर कारवाई करावी. देशात 15 कोटी लीटर दूध तयार होते. तर वाटप 64 कोटी लीटर होते. मग बाकीचे दुध कुठून येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या देशामध्ये प्रशासन करणारेच लोक उद्योगपती झाले असल्यामुळे कुठलीही कारवाई होत नाही. म्हणून देशात शेतीमालाच्या हमी भावाचा प्रश्न बिकट झाला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - 'गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे'
कोरोना व्हायरसवर बोलताना ते म्हणाले, या व्हायरमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. हे दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र, गेल्या काही वर्षात सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. भारतात जितक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत तितके मृत्यू कुठल्याही युद्धातसुद्धा झाला नाही. तरीदेखील राज्यकर्त्यांना समजत नाही? महाराष्ट्रात गेल्या 15 ते 20 वर्षांत 80 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'आम्ही सरकारला सांगू .. सीएए, एनपीआर, कायद्याविरोधात ठराव करा'
प्रवीण दरेकर म्हणाले होते, बाळासाहेब थोरात म्हणाले की कर्जमाफी करून आत्महत्या होतात. तुम्हाला दिसत नाही का ? लिहिता वाचता येते ना? स्वामिनाथन आयोगाचा अहवाल बघा. सर्वच पक्षाची लोक सध्या खोटे बोलत आहेत. सर्वांचे धोरण शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करणे योग्यच आहे. संपुर्ण कर्जमाफी दिली पाहिजे. तसेच आम्ही काय भीक मागत नाही, याआधी देखील कांद्याच्या प्रश्नावर सरकार कोसळले आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.