ETV Bharat / state

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी वणीत जनता कर्फ्यू - नाशिक जिल्हा लेटेस्ट न्यूज

राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नाशिकच्या दिंडोरी व वणी परिसरात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी वणीत जनता कर्फ्यू

author img

By

Published : Apr 18, 2021, 4:39 PM IST

दिंडोरी (नाशिक) - राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नाशिकच्या दिंडोरी व वणी परिसरात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वणी परिसरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या बंदला वणी गावातील व्यवसायिक आपली अस्थापने पूर्णपणे बंद ठेवून चांगला प्रतिसाद देत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी वणीत जनता कर्फ्यू

नागरिकांकडून कोरोना नियमांचे काटेकोर पालन

वणी परिसरात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने, त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात कोवीड कक्ष उभारण्यात येत आहे. तसेच वणीच्या ग्रामीण रुग्णालयात इतर आजारांच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची व्यवस्था ही पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. तसेच नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा - कोकणातील कातळशिल्पांच्या प्रस्तावाचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार - अमित देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.