ETV Bharat / state

गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरी नदीला पूर - नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा गोदावरी नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

godavari river flooded as all doors of gangapur dam opened since morning
author img

By

Published : Aug 3, 2019, 12:58 PM IST

Updated : Aug 3, 2019, 3:14 PM IST

नाशिक - पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून सकाळी ९ वाजल्यापासून ११,३५८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड येथील दुतोंड्या मारुती मूर्ती पाण्यात गेली आहे.

गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरी नदीला पूर

गेल्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यासोबतच दारणा धरणातून 19 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर, नांदुर मध्यमेश्वर धरणातून 47 हजार 739 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणातून सोडण्यात आलेले हे पाणी जायकवाडी धरणात जात आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण जरी कमी असले, तरी नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या ह्या पाण्यामुळे मराठवाड्याचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Intro:गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले, गोदावरी नदीला पूर...

Body:नाशिक मध्ये पावसाची संततधार सुरू,ह्या मुळे गंगापुर धरणं 90 टक्के भरले असून धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत, गंगापूर धरणातून सकाळी नऊ वाजेपासून 11358 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे ,गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे, रामकुंड येथील दुतोंड्या मारुती मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे,तसेच आजूबाजूच्या हॉटेल्स तसेच दुकानांमध्ये देखील पुराचे पाणी शिरले आहे..ह्या आठ दिवसात दुसऱ्यांदा गोदावरी नदीला पूर आला आहे..प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे...
यासोबतच दारणा धरणातून 19 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केलेला जातोय..नांदुर मध्यमेश्वर धरणातून 47 हजार 739 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय,धरणातून सोडणायत आलेले हे पाणी जायकवाडी धरणांत जात आहे,मराठवाड्यात पाऊस जरी कमी असला तरी नाशिक जिल्ह्यातुन जाणाऱ्या ह्या पाण्यामुळे
मराठवाड्याचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे..

वॉक थ्रू
कपिल भास्कर नाशिक प्रतिनिधी..

Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.