नाशिक - गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत नाशिकमध्ये घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भाविक आपल्या लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने गोदावरी नदीपात्रात विसर्जित करत आहेत. अशातच नाशिकच्या विद्यार्थी कृती समितीच्या वतीने 'देव द्या, देवपण घ्या' या उपक्रमाच्या माध्यमातून 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले जातेय.
हेही वाचा - नाशकात तब्बल ६२ किलो गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
या उपक्रमात नाशिक शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी मूर्तीदान करण्याचे आव्हान करत आहेत. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या 9 वर्षापासून 'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रम राबवला जात आहे. दरवर्षी या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आकाश पगार यांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक! नाशिकमध्ये प्रियकराने प्रियसीला जिवंत जाळले
मागील वर्षी नाशिकमध्ये महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी पावणेदोन लाख गणेशमूर्ती दान केल्या होत्या. यावर्षी हा आकडा वाढेल, असा अंदाज आहे.