ETV Bharat / state

Ramdas Athawale on UP Election 2022 : उत्तरप्रदेश निवडणुकीत रिपाइंला आठ ते दहा जागा द्या - मंत्री रामदास आठवले - रामदार आठवले प्रतिक्रिया उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक 2022

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ( UP Election 2022 ) आरपीआयला आठ ते दहा जागा द्याव्या, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister Ramdas Athawale ) यांनी केली आहे.

Ramdas Athawale
मंत्री रामदास आठवले
author img

By

Published : Jan 10, 2022, 7:16 PM IST

नाशिक - येणाऱ्या ५ राज्यांच्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत राहणार आहोत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ( UP Assembly Election 2022 ) आरपीआयला ( RPI ) आठ ते दहा जागा द्याव्या, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष ( RPI President ) आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी केली आहे. युती झाली नाही तर आम्ही आमच्या स्वबळावर लढू, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ( Union Minister Ramdas Athawale in Nashik )

पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

काय म्हणाले रामदास आठवले?

गोवा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, निवडणुका न लढता महामंडळ देण्याचे भाजपने कबूल केले आहे. भाजपची मते खाण्यापेक्षा मी त्यांच्यासोबत जाणार आहे. प्रचार देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाला अध्यक्ष मिळत नाही. सोनिया गांधी तात्पुरत्या अध्यक्ष आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसने विश्वास गमावलेला आहे. कोणत्याही राज्यात काँग्रेस सशक्त नाही, असा टीकाही त्यांनी केली. शिवसेना नेते संजय खासदार राऊत यांनी पर्रिकर परिवाराला सेनेत यायचे निमंत्रण दिले याबाबत विचारले असता पर्रिकर यांच्या मुलाला सेनेने ऑफर दिली असली तरी ते सनेकडे जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक पुढे ढकलायला हवी होती. मात्र, निवडणूक आयोगाने जे नियम दिले त्यानुसार निवडणूक होईल, असे ते म्हणाले.

भाजपने शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावे - आठवले

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपने मन मोठे करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर द्यावी, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. यावेळी दोन्ही पक्षांनी पुन्हा युती करावी, असा सल्ला त्यांनी दिला. निवडणुक प्रचारात देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असा भाजपचा प्रचार होता. तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही. मात्र, निकालानंतर आकडे आले. त्यावेळी आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, हे लक्षात आल्यावर सेनेने मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरला. तेव्हा सेनेचा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला भाजपने फेटाळला. भाजपला विश्वास होता, काँग्रेस पाठिंबा देणार नाही आणि त्यांचा तो अंदाज चुकला व सेनेने दोन्ही काँग्रेससोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, सेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद दिल्यास ते युती करतील. भाजप हा सल्ला ऐकेल की नाही याबाबत त्यांनी बोलणे टाळले. तसेच उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहे. भीम शक्ती व शिव शक्ती एकत्र आली होती. उद्धव ठाकरे यांनी लवकर बर होऊन कोरोना विरोधात दंड थोपटावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Rajnath Singh Corona Positive : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण; ट्वीट करून दिली माहिती

देशात कोरोनामुळे 5 लाख मृत्यू झाले. गर्दी टाळायला हवी होती. कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी जशी सरकारची तशी आपलीही आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी २५ टक्के रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे काळजी करावी, असे आवाहनही मंत्री आठवले यांनी केले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आलो होतो, असे यावेळी ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.