ETV Bharat / state

Girl killed in leopard attack : बिबट्याच्या हल्ल्यात साडेसहा वर्षांची बालिका ठार, नाशिक जिल्ह्यातील घटना

author img

By

Published : Apr 28, 2022, 10:54 AM IST

एका साडेसहा वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला ( Girl killed in leopard attack in Nashik district ) केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरीक्षेत्राचे पथक घटनास्थळी ( leopard attack news of Dhondegaon in Nashik ) रवाना झाले.

leopard
बिबट

नाशिक - एका साडेसहा वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला ( Girl killed in leopard attack in Nashik district ) केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरीक्षेत्राचे पथक घटनास्थळी ( leopard attack news of Dhondegaon in Nashik ) रवाना झाले. गायत्री नवनाथ लिलके, असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

हेही वाचा - Maharashtra Water Scarcity : नाशिकच्या येवला तालुक्यात 7 टँकरद्वारे भागवली जाते आहे १५ गावांची तहान

बिबट्याने गायत्रीला जबड्यातून सोडून देत धूम ठोकली - गायत्री ( रा. मुळ कोचरगाव ) काही दिवसांपूर्वी ( leopard attack on Gayatri Navnath Lilke ) धोंडेगावात तिच्या मामाच्या घरी आली होती. रात्री घराबाहेर खेळत असताना बिबट्या अचानकपणे आला आणि त्याने गायत्रीवर झडप टाकली. बिबट्याने तिला जखमी केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने गायत्रीला जबड्यातून सोडून देत धूम ठोकली.

गिरणारे पंचक्रोशीतील हा पंधरवड्यात दुसरा हल्ला आहे. १० एप्रिल रोजी साडगाव रस्त्यावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका मजुरावर बिबट्याने हल्ला चढविला होता. सुदैवाने या हल्ल्यात तो मजूर बचावला. गिरणारेपासून काही अंतरावरच असलेल्या धोंडेगावात हा हल्ला झाला. दरम्यान, गंगापूर - गोवर्धन शिवारातसुद्धा रात्री साडेदहा वाजता काही दुचाकीचालकांना बिबट्या रस्ता ओलांडताना नजरेस पडल्याची माहिती काही लोकांनी वनखात्याला दिली. वनकर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता, बिबट्याच्या पाऊलखुणा किंवा कुठल्याही सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसला नाही. येथील हॉटेल व्यावसायिक, तसेच रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा - रसवंतीगृह चालवणाऱ्या आई वडीलांचे स्वप्न केलं पूर्ण, मुलगा बनला जलसंधारण अधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.