नाशिक : नाशिक-मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या वळणावर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील क्रुझर (MH 22 U 2801) उलटून झालेल्या अपघातात 11 वर्षीय मुलगी ठार तर सात जण जखमी झाले. दर्शना विजय कांबळे (रा. मंठा, जि. जालना) असे मृत मुलीचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीमने घटनास्थळी दाखल होत जखमींना टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून दोन्हीकडची वाहतूक सुरळीत चालू आहे.
जखमींची नावे...
1) लिहीलाबाई लिंबाजी राठोड (वय -30 वर्ष रा. मालेगाव)
2) लिंबाजी राठोड (वय-40 वर्षे रा .मालेगाव)
3) विठ्ठल चव्हाण (वय - 45 रा. वसई)
4) जयश्री गजानन पवार (वय -34 रा. वसई)
5) अनवी गजानन पवार (वय-1 वर्ष रा.वसई)
6) कल्पना राजेश जाधव (वय- 30 वर्ष रा. वसई)
7) शामराव चव्हाण (वय -60 वर्ष रा. वसई)