ETV Bharat / state

लग्नासाठी 'ब्लॅकमेलिंग', गोदावरी नदीत उडी घेऊन तरुणीची आत्महत्या

शिवाजी केदारे (वय ३८) हा व्यक्ती मागील काही दिवसांपासून रोशनीला आपल्याशी लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत होता. त्याने रोशनीच्या काही फोटो काढले होते. त्या फोटोचा आधार घेऊन तो तिला लग्नासाठी 'ब्लॅकमेल' करत होता. महत्वाचे म्हणजे, रोशनीचा विवाह या महिन्याच्या २० तारखेला होणार होता.

author img

By

Published : Jun 4, 2019, 8:26 AM IST

Updated : Jun 4, 2019, 9:29 AM IST

संशयीत शिवाजी केदारे

नाशिक - गंगापूरच्या एका २० वर्षीय तरुणीने शिवाजी केदारे या व्यक्तीकडून लग्नासाठी होत असलेल्या 'ब्लॅकमेलिंग'ला कंटाळून गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशनी हिरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मृत रोशनी हिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजी केदारे (वय ३८) हा व्यक्ती मागील काही दिवसांपासून रोशनीला आपल्याशी लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत होता. त्याने रोशनीच्या काही फोटो काढले होते. त्या फोटोचा आधार घेऊन तो तिला लग्नासाठी 'ब्लॅकमेल' करत होता. महत्वाचे म्हणजे, रोशनीचा विवाह या महिन्याच्या २० तारखेला होणार होता.

तेव्हा संशयिताने रोशनीच्या होणाऱ्या नवऱ्याचा तपास करून रोशनी आणि माझे प्रेमसंबध होते असे सांगितले. तसेच त्याने त्याच्याजवळ असलेली फोटो होणाऱ्या नवऱ्याला दाखवले. त्यामुळे रोशनीचा विवाह धोक्यात आला. परिणामी रोशनीने संशयिताच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून गोदावरी नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केली.

रोशनी हिच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित शिवाजी याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तेव्हा पोलिसांनी शिवाजी केदारे याला ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास पोलिस निरिक्षक नितीन पवार करत आहेत.

Intro:नाशिकमधील गंगापूरवरील एका 20 वर्षीय तरुणीने एका 38 वर्षीय शिवाजी प्रभाकर केदारे नावाच्या व्यक्तीकडून लग्नासाठी होणाऱ्या ब्लँकमेलिंगला कंटाळून गोदावरी नदीत उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय..

Body:याप्रकरणी मयत युवतीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित केदार विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी नवीन गोदापार्क परसातील बापू पुलावरून रोशनी हिरे वय 20 या युतीने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केदारे विरुद्ध सोमवारी फिर्यादी मनीषा दिलीप हिरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय

Conclusion:रोशनी चा विवाह या महिन्याच्या 20 तारखेला होणार होता मात्र शिवाजीला ही भाग खटकल्याने तो लग्नासाठी रोशनी वर दबाव वाढवत होता त्याने तिच्या काही मोबाईलवरील छायाचित्राच्या आधारे ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली तसेच तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शिवाजी केदारे या इसमाने रोशनी वर ब्लॅकमेल करत तिचा विवाह कोणाशी होणार याचा तपास करत या मुलाशी तिचा विवाह होणार होता त्या मुलालाही त्याच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे सांगितले त्यामुळे तिच्या होणारा विवाह सुद्धा धोक्यात आला परिणामी केदारच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून रोशनी गोदावरी नदीत उडी घेतल्याने तीचा मृत्यू झाला
संशयित केदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार करीत आहेत
Last Updated : Jun 4, 2019, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.