नाशिक - अयोध्येमध्ये आज (बुधुवार) राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. यानिमित्त देशासह राज्यात जल्लोष साजरा केला जात आहे. नाशिकमध्येही अभूतपूर्व जल्लोशाचे वातावरण होत. नाशिकमधील कार्यक्रमांना भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती दर्शवली. आयोध्येत श्री राम मंदिर व्हावं, यासाठी भाजपने पुढाकार घेतला होता. मात्र, आता काहीजण याचे श्रेय घेत आहेत. मात्र, त्यांची 'बेगानी शादी में,अब्दुला दिवाना' अशी परिस्थिती झाल्याचा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला लगावला.
सकाळपासूनच भाजप पदाधिकारी, साधू महंत, विहीप, पुरोहित संघ यांच्यावतीने पंचवटी परिसरातील पूजा अभिषेक, आरती, रामरक्षा पठण आदी धार्मीक कार्यक्रम पार पडले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अयोध्येत श्री राम मंदिर व्हावं यासाठी भाजपने पुढाकार घेतला होता. मात्र, आता काहीजण याचे श्रेय घेत आहेत. मात्र, त्यांची 'बेगानी शादी में,अब्दुला दिवाना' अशी परिस्थिती झाल्याचा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला लगावला. शिवसेना आता पूर्वीची बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, शिवसेची भूमिका आता बदलली आहे. सोनिया गांधी यांच्या सोबत एकत्र राहणारी शिवसेना कुठे आणि बाळासाहेबांची शिवसेना कुठे असंही महाजन यावेळी म्हणाले. आमंत्रण येण्याअगोदरच मुख्यमंत्र्यांना कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांनी आयोध्येला जाऊ नका, असा सल्ला दिला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गोची झाली. खुर्चीसाठी काहीही चालेल अशी परिस्थिती असल्याचे महाजन म्हणाले.
श्री काळाराम मंदिरात दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली नाही
आयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या आदल्या रात्री उशिरा पोलिसांनी साधू महंत आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत जल्लोश करू नये, यासाठी 144 कलम अंतर्गत नोटिसा बजावल्या होत्या. तरीही पोलिसांच्या नोटिसा झुगारून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राममंदिर भूमीपूजनाचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर पंचवटी कारंजा इथे भाजपच्यावतीने कारसेवकांची पाद्यपूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री काळाराम मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, प्रवेशद्वारावरच श्री काळारामाच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. यावेळी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, महानगर प्रमुख महेश बडवे उपस्थित होते.