ETV Bharat / state

नाशकात मद्यधुंद टोळक्याकडून आश्रमाची तोडफोड करत महंतांना मारहाण

त्र्यंबकेश्वर येथील तीन साधूंची पालघर येथे हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये महंतांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पालघरमधील प्रकरणाचे सबंध राज्यात पडसाद उमटले होते.

आश्रमाची तोडफोड
आश्रमाची तोडफोड
author img

By

Published : Jun 26, 2020, 3:35 PM IST

Updated : Jun 26, 2020, 3:52 PM IST

नाशिक - शहराच्या पंचवटी परिसरातील औदुंबरनगरमध्ये काल(गुरुवार) रात्रीच्या सुमारास मद्यधुंद टोळक्याने महंत भक्तीचरण दास यांच्या आश्रमावर दगडफेक करत तोडफोड केली. निर्माणाधीन मंदिराची तोडफोड केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथील तीन साधूंची पालघर येथे हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये ही घटना घडली आहे. पालघरमधील प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटले होते.

नाशकात मद्यधुंद टोळक्याकडून आश्रमाची तोडफोड करत महंतांना मारहाण

औदुंबरनगर भागात राहत असलेले महंत पालकदास महाराज यांनाही टोळक्याने मारहाण केली. महंत भक्तीचरण दास यांच्या आश्रमावर दगडफेककरून आश्रमाच्या काचा आणि पाण्याची टाकी फोडली. तर मंदिराच्या बाहेर लावण्यात आलेले फलक देखील फाडण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या हल्ल्यामागे नेमका उद्देश काय होता याबाबत पोलीस तपास करत असून टोळक्याचा शोध सुरू केला आहे. धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिक शहरात महंताना मारहाण झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Last Updated : Jun 26, 2020, 3:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.