ETV Bharat / state

नाशिक : म्यूकरमायकोसिसवर जन आरोग्य योजनेअंतर्गत 'या' ८ रुग्णांलयात होणार मोफत उपचार

म्यूकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजारावर उपचार मोफत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

नाशिक म्यूकरमायकोसिस न्यूज
नाशिक : म्यूकरमायकोसिसवर जन आरोग्य योजनेअंतर्गत 'या' ८ रुग्णांलयात होणार मोफत उपचार
author img

By

Published : May 30, 2021, 6:46 PM IST

नाशिक - महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत म्यूकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजारावर उपचार मोफत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

'अँटी फंगल’ आणि ‘एम्फोटेरीसिन बी’ इंजेक्शन मोफत
दिलासादायक म्हणजे म्यूकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी लागणारी ‘अँटी फंगल’ आणि ‘एम्फोटेरीसिन बी’ इंजेक्शन ही औषधे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत रुग्णालयांना मोफत पुरविण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच सदर योजना ही कॅशलेस पद्धतीने राबविली जात असून योजनेचा लाभ घेण्याकरिता रुग्णालयात रुग्णांस भरती करतेवेळी रेशन कार्ड व आधारकार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ती कागदपत्र रुग्णालयातील ‘आरोग्य मित्र’ यांचेकडे सादर करावित, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

कागदपत्र उपलब्ध नसल्यास
कागदपत्रे रूग्णालयात दाखल होताना उपलब्ध नसल्यास रुग्णालयास तशी कल्पना व लेखी स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी देऊन योजनेचा लाभ मिळविता येऊ शकतो. परंतु सदरील कागदपत्रे विहित कालावधीत जमा करणे आवश्यक असेल. योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अथवा रुग्णालयाने योजनेचा लाभ नाकारल्यास रुग्णालयातील "आरोग्यमित्र" अथवा खाली दिलेल्या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. मात्र या योजनेअंतर्गत कोरोना उपचाराच्या अनुषंगाने लागणाऱ्या महागड्या औषधांचा समावेश करण्यात आलेला नाही, याची रुग्ण आणि नातेवाईकांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

ही आहेत ती आठ रूग्णालये
मोफत उपचार देणाऱ्या या आठ रुग्णालयांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक, एस. एम. बी. टी. वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय घोटी, डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय, नाशिक, सामान्य रुग्णालय, मालेगाव,
नामको चारिटेबल हॉस्पिटल, नाशिक, व्होकार्ट हॉस्पिटल, नाशिक, सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, नाशिक या रुग्णालयांचा समावेश असून या सर्व रुग्णांलयांची यादी nashikmitra.in व nashik.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे..

योजनेचा लाभ नाकारल्यास येथे संपर्क साधा
योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अथवा रुग्णालयाने योजनेचा लाभ नाकारल्यास रुग्णालयातील "आरोग्य मित्र"अथवा एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए संस्थेचे जिल्हा कार्यालय प्रतिनिधी डॉ. राहुल सोनवणे ८०९७५३८१५१, डॉ. समकीत साकला ८०९७५३८१५० यांचेशी संपर्क करावा. तसेच हे कामकाज पाहण्यासाठी घटना व्यवस्थापक म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निलेश श्रींगी यांची नेमणूक करण्यात आली असून जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. पंकज दाभाडे काम पाहणार आहेत. तसेच अन्य मदतीसाठी अथवा तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 155388 किंवा 18002332200 यावर संपर्क साधवा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.