ETV Bharat / state

Nashik Free-Style Fight : कॉलेजमध्ये दोन तरूणींमध्ये हाणामारी; कारण ऐकून व्हाल थक्क... - नाशिक व्हिडिओ

शुल्लक कारणावरून भर मैदानात दोन तरुणींची फ्री-स्टाइल हाणामारी पाहण्यास मिळाली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुल्लक कारणावरुन होणाऱ्या हाणामारीचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

तरूणींमध्ये हाणामारी
तरूणींमध्ये हाणामारी
author img

By

Published : Jan 2, 2022, 1:35 PM IST

नाशिक - कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. शुल्लक कारणावरून भर मैदानात दोन तरुणींची फ्री-स्टाइल हाणामारी ( Nashik Free-Style Fight ) पाहण्यास मिळाली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुल्लक कारणावरुन होणाऱ्या हाणामारीचा व्हिडिओ ( Viral Video ) चर्चेचा विषय ठरत आहे.

कॉलेजमध्ये दोन तरूणींमध्ये हाणामारी

एकमेकांचे केस धरून केली मारहाण -

शाळा-महाविद्यालयांत तरुणांमध्ये राडा होणे हे काही नवीन राहिले नाही. आता तर तरुणींमध्येही कडाक्याचे भांडण होत आहे. नाशिकमधील एका नामांकित महाविद्यालयात देखील हाच प्रकार बघायला मिळाला. दोन तरूणींमध्ये मारहाण झाली आहे. शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. दुपारच्या सुमारास कॉलेजच्या मैदानावर दोघींनी एकमेकांना चापटा आणि लाथा मारल्या. त्यानंतर एकमेकांचे केस धरून ओढताण सुरू होती. वाद विकोपाला गेला हे लक्षात आल्यावर त्यांच्या मैत्रिणींनी मध्यस्थी केली आणि दोघींना बाजूला केलं.

ड्रेसवरून झाला होता वाद -

कॉलेज प्रशासनाने दोन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना फोन करून तक्रार केली आहे. ३० डिसेंबरला दोन्ही मुलींमध्ये ड्रेसवरून वाद झाले होते, असे तपासात समोर आले आहे. प्रकरण इतके वाढले की त्याचदिवशी दुपारी त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. सध्या सोशल मीडियावर दोघांमधील या भांडणाला WWF असे नाव दिले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.