ETV Bharat / state

दिलासादायक... नाशिकमधील 'या' चार तालुक्यांत एकही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण नाही

नाशिक जिल्ह्यातील देवळा, सुरगाणा, पेठ,कळवण तालुक्यांत आज एकही कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार ९११ कोरोना रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

nashik corona update
नाशिक कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 27, 2020, 2:13 PM IST

नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार देवळा, सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुक्यात एकही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सध्या या चार तालुक्यांत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ९११ जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २१३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिली आहे

नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेले अ‌ॅक्टिव्ह रुग्ण :

नाशिक ग्रामीण ६९, चांदवड ०९, सिन्नर ३६, दिंडोरी १२, निफाड ४०, नांदगांव १८, येवला ३९, त्र्यंबकेश्वर ०४, बागलाण १२, इगतपुरी २३, मालेगाव ग्रामीण ०६ असे एकूण २६८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ९९६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२७ तर जिल्ह्याबाहेरील ३९ असे एकूण १ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 554 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेले मृत्यू

नाशिक ग्रामीण ३८ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७३ व जिल्हा बाहेरील ११ अशा एकूण २१३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.