नाशिक- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून रविवारी 470 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 346 जण एकट्या नाशिक शहरातील आहेत. दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 312 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात 34 हजार 777 संभाव्य रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातील 9 हजार 491 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 6 हजार 351 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर आतापर्यंत 390 जणांचा मृत्यू झाला आहे.
आमदार नरेंद्र दराडे यांनाही कोरोनाची लागण
नाशिक शहरासोबत ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. येवला हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.येवल्यात आतापर्यंत 205 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील 168 जण कोरोनामुक्त झाले आहे. विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांना ही कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दराडे हे येवला येथील अधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते यांची भेट घेत होते, त्यामुळे दराडे यांना भेटलेल्या नागरिकांची चिंता वाढली आहे.
मृतांची संख्या
नाशिक ग्रामीण 87
नाशिक मनपा 205
मालेगाव मनपा 82
जिल्हा बाह्य 16
एकूण नाशिक जिल्ह्यात 390
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती-
एकूण कोरोनाबाधित रुग्ण 9491
कोरोनामुक्त - 6351
एकूण मृत्यू -390
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-4700